You are currently viewing आजपासून लागू होणार नवा नियम… म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी वेळेत बदल

आजपासून लागू होणार नवा नियम… म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी वेळेत बदल

 

स्टॉक मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये (Equity Mutual Fund) खरेदी आणि विक्रीची वेळ पुन्हा एकदा 3 वाजता केली आहे. या बदलामुळे गुंतवणूकरांना म्युच्युअल फंड खरेदी करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. 

 

म्युच्युअल फंडच्या खरेदी-विक्रीचं हे नवीन टाइम टेबल आज 19 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. SEBI ने यासंबंधी अधिक माहिती देत, म्युच्युअल फंडला नियमन करणारी संस्था असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इंडियाचे (AMFI )अध्यक्ष निलेश शाह यांनी ट्विट करत इक्विटी म्युच्युअल फंडाच्या कटऑफ वेळेत बदल करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

 

निलेश शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंड यूनिटला खरेदी किंवा विकायचं असेल तर दोन्हीसाठी 3 वाजताची वेळ असणार आहे. यावेळी सगळ्या योजनांचा कट ऑफ टाइम पुन्हा एकदा 3 वाजता करण्यात आला आहे.

 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेट स्कीम आणि कंजरव्हेटिव्ह हायब्रिड फंडाच्या खरेदी-विक्रीची वेळ बदलली गेली नाही. खरंतर, सगळ्यांनी आधी काही दिवसांसाठी 3 वाजताची वेळ 12.30 केली होती. पण आता पुन्हा ग्राहकांच्या सोयीसाठी जुनी वेळ लागू करण्यात आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना त्या दिवशीची निव्वळ मालमत्ता मूल्य (Net Asset Value) मिळवण्यासाठी जास्त वेळ मिळतो.

 

SEBI ने एप्रिलमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे म्युच्युअल फंड्सच्या युनिट खरेदी आणि विक्रीसाठी कट ऑफ टाइम कमी केला होता. यामध्ये लिक्विड आणि ओव्हरनाइट योजनांचादेखील समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − ten =