You are currently viewing नगरपंचायतच्यावतीने जिल्ह्यात नगरपालिकेचे पहिले कोविड केअर सेंटर सुरू होणार – मुख्याधिकारी अवधुत तावडे

नगरपंचायतच्यावतीने जिल्ह्यात नगरपालिकेचे पहिले कोविड केअर सेंटर सुरू होणार – मुख्याधिकारी अवधुत तावडे

कणकवली
नगरपंचायतच्यावतीने जिल्ह्यात नगरपालिकेचे पहिले कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा मान मिळवल्यानंतर, आता पुन्हा कणकवली नगरपंचायत जिल्ह्यात सर्वप्रथम पुढचे पाऊल टाकत आहे.

कणकवलीत दिवसेंदिवस वाढत असलेले कोविडचे रुग्ण आणि शासनाकडुन गृहविलगीकरण अंशतः बंद करण्यात आल्यानंतर, त्या अनुषंगाने कणकवली नगरपंचायतने हा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे.

कणकवलीतील भगवती मंगल कार्यालय येथे १०० बेडचे संस्थात्मक विलगीकरण केंद्र नगरपंचायतमार्फत सुरू करण्यात येणार आहे. त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. शासनाने गृह विलगीकरण अंशतः बंद केल्यानंतर त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या सुचनांनुसार संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येत असल्याची माहिती कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी दिली.

हे संस्थात्मक विलगीकरण केंद्र लवकरच कोविड रुग्णांच्या सेवेत येणार असुन, या विलगीकरण केंद्रात कोविड पॉझिटिव्ह असलेले; पण कोविडची लक्षणे नसलेल्या १०० रुग्णांना एकाच वेळी ठेवता येणार आहे. यामुळे कोविडच्या समुह संसर्गाच्या प्रसाराची गती आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.

याकरिता नगराध्यक्ष समीर नलावडे आणि नगरसेवक यांचेदेखील सहकार्य घेण्यात येत असुन, येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांना त्यांच्या जेवण, नाष्टाची व्यवस्था त्यांच्या नातेवाईकांनी करायची आहे. मात्र, या रुग्णांना मोफत वायफाय सेवा, योगा मार्गदर्शन आणि मनोरंजनासाठी टी.व्ही.ची सोयदेखील उपलब्ध असणार असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.

कणकवली नगरपंचायतकडुन या संस्थात्मक विलगीकरण केंद्राची तयारी अंतिम टप्प्यात आली असुन, लवकरच हे विलगीकरण केंद्र रुग्णांच्या सेवेसाठी खुले होईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + eleven =