You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावातील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावातील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

वैभववाडी

वैभववाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादामिया पाटणकर, वैभववाडी पंचायत समितीच्या माजी सभापती मीनाताई बोडके, वसंत नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली उंबर्डे गावातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रतिनिधी विकासभाई सावंत यांनी काँग्रेस पक्षाची शाल गळ्यात घालून सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. तौफिक सारंग,अहमद बोबडे, महंमद रमदूल, तबरेज पाटणकर,नतू रमदूल, फैजान पाटणकर, वसीम काझी,दिपक मोपेरकर,करीम बोबडे, अस्लम बोबडे,जावेद रमदूल, मुराद लांजेकर, अब्दुल बोबडे,हुसेन बोबडे, तन्वीर बोबडे,मोहेनुद्दीन रमदूल, दिलशाद बोबडे,नसीमा सारंग, रमजान रमदूल, भीकू पाटणकर, गुलाम पाटणकर, दिलदार टिवले, जुबेर लांजेकर, हर्षद पाटणकर, सोहेल रमदूल, जुनेद बोबडे,हापीजा टिवले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − one =