You are currently viewing राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गच्या पूर्वा गावडेने पटकावले रौप्यपदक

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गच्या पूर्वा गावडेने पटकावले रौप्यपदक

सिंधुदुर्गनगरी :

 

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने यश मिळवले असून गुजरात – अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वूमन्स सिरीज – २ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे.

जुलै २०२२ महिन्यात ओडिशा – भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर वॉटर पोलो स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर १ ऑगस्टला अहमदाबाद येथे झालेल्या १८ वर्षाखालील ज्युनिअर मुलीच्या खेलो इंडिया वूमन्स सिरीज – १ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत २०० मीटर बटरफ्लाय मध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता. त्याच बरोबर कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत विविध जलतरण क्रीडा प्रकारात पाच पदके पटकावली होती. त्यानंतर आता पुन्हा अहमदाबाद येथे रविवारी झालेल्या दुसऱ्या राउंड मध्येही पूर्वाने आपला परफॉर्मन्स कायम राखत खेलो इंडिया वूमन्स सिरीज- २ मध्ये ज्युनियर मुलींच्या गटात २०० मीटर बटरफ्लाय मध्ये दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले आहे. तसेच ४०० मीटर फ्री – स्टाईल प्रकारातही चौथा क्रमांक पटकावला आहे.

पूर्वा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथे राहणारी असून पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये दहावीच्या शिक्षणा बरोबरच जलतरण चे प्रशिक्षण घेत आहे पूर्वाच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − six =