You are currently viewing भारत जोडो यात्रा !

भारत जोडो यात्रा !

काँग्रेस ने कात टाकली!

भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळत आहे.. हया यात्रेच्या माध्यमातून जो प्रतिसाद मिळत आहे तो पाहता कॉंग्रेसने कात टाकलेली असून काँग्रेस आता अधिक जोमाने काम करताना दिसेल असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते धनंजय जुन्नरकर हयांनी केलेले आहे.

अखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मिडीया विभागाचे प्रमुख व माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश हयाच्या सोबत भारत जोडो यात्रेत सोबत चालताना जयराम रमेश यांनी युवकांनी सदय राजकीय परिस्थीतीत कसे वर्तन करावे या बाबत मार्गदशन केले. तसेच ACT ही पॉलीसी समजावून सांगीतली
A म्हणजे Aggression, C म्हणजे
Consciousness आणि – T म्हणजे Timeliness. म्हणजेच आक्रमकता, चेतना आणि समयसूचकता.
ह्या माध्यमातून विरोधकांचे हल्ले परतावून लावणे बाबत सूचना केली.

व्यक्ती आधी लढाई मनातून हरतो नंतर प्रत्यक्षात हरतो. मनाने खंबीर राहा. आपल्याला कुणी मदत करो वा ना करो! आपल्याला आक्रमकतेने लढायचे आहे. याबाबत कार्यकार्यांनी कामाला लागण्या बाबत सूचना दिली.

पहाटे 4.00 वाजल्या पासून प्रचंड गारठयातही महिला, मुले, युवक, वृद्ध नागरीक लाखोंच्या संख्येने राहुल गांधीच्या यात्रेची वाट पाहात उभे असतात. महिला दारात , रसत्यावर रांगोळी काढून हातात औक्षणा चे ताट घेऊन राहुल गांधी यांचा वाट पाहातात व नंतर यात्रेत सहभागी होतात., लाखो लोक यात्रेत सहभागी होऊन चालत आहेत हे दृश्य भाजपाच्या उरात धडकी भरवणारे आहे, असेही धनंजय जुन्नरकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − two =