You are currently viewing वैभववाडी -कोळपेमधील काँग्रेस, शिवसेनेचे अनेक जण भाजपात

वैभववाडी -कोळपेमधील काँग्रेस, शिवसेनेचे अनेक जण भाजपात

आम नितेश राणेंकडून भाजपा प्रवेशाचा सिलसिला सुरूच

कणकवली

कणकवली विधानसभा मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यामधील कोळपे राजानगर येथील काँग्रेस व शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश या निवासस्थानी प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्या कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी काँग्रेस बूथ अध्यक्ष कादिर थोडगे, मजीद नंदकर, मुसा नाचरे, हसन लांजेकर, इस्माईल नाचरे, शेरापूद्दीन लांजेकर, बाबालाल थोडगे, बशीर नंदकर, कादिर नाचरे, रमजान नाचरे, दाऊद नाचरे, दिलदार थोडगे, युसूफ नंदकर, तौफिक नंदकर, शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार तौफिक लांजेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलावर सारंग, सद्दाम लांजेकर, अमोल जाधव, सलाउद्दीन नाचरे, आअल्ली सारंग आदींनी मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आधी उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणेंनी भाजपा मध्ये प्रवेशाचा सिलसिला सुरू केला असून यामुळे कणकवली मतदारसंघात भाजपाची ताकद वाढत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा