You are currently viewing वर्ध्यात रंगणार राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

वर्ध्यात रंगणार राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

विदर्भ विभाग अध्यक्ष सिद्धार्थ कुलकर्णी यांची माहिती.

९६ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे *वर्धा* शहरामध्ये *अग्निहोत्री कॉलेज* मध्ये राज्यस्तरीय काव्य सोहोळा *रविवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित केला आहे*


या संमेलनाचे उद्घघाटन केंद्रीय विकास आणि *परिवहन मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब करणार असून मुख्य अतिथी म्हणून खासदार माननीय रामदासजी तडस आणि आमदार माननीय डॉ पंकज भाऊ भोयर उपस्थित राहणार आहेत*
कार्यक्रमाचे *अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमाट* हे भूषविणार असून *सिद्धार्थ कुलकर्णी, डॉ बळवंत भोयर, सिध्देश्वर कोळी, संदीप जोशी, नागोजी नाणार, रामदासजी अंबतकर, विठ्ठलराव अवचट, विनायकराव जाधव* आदी मान्यवर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत


कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन कवयित्री वैशाली गायकवाड* या करणार आहेत
असे कार्यक्रमाच्या *मुख्य अयोजिका लता हेडाऊ* यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे
*कार्यक्रम सकाळी दहा वाजता अग्निहोत्री कॉलेज , रामनगर वर्धा* येथे सुरू होणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + ten =