आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश
भालचंद्र साठे यांच्या हस्ते सर्वेच्या कामाचा झाला शुभारंभ
वैभववाडी
करूळ व भुईबावडा या दोन मार्गाना जोडणाऱ्या भुईबावडा ते दिंडवणे या पर्यायी मार्गाच्या सर्वेचे काम हाती घेण्यात आले आहे. हा मार्ग अस्तित्वात यावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे या कामाला गती प्राप्त झाली आहे. लवकरच नवीन मार्ग अस्तित्वात येणार असल्याने वाहनचालक व नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे करूळ व भुईबावडा हे दोन प्रमुख कोकणातील घाट मार्ग आहेत. मात्र अतिवृष्टी या घाट मार्गात मोठया प्रमाणात पडझड होते. अनेक वेळा दरडी कोसळून मार्ग बंद होतो. याचा मोठा फटका वाहतूकीवर होतो. कुठलाही घाट बंद असताना वाहतूकीवर परिणाम होऊ नये. यासाठी हा पर्यायी मार्ग हाती घेण्यात आला आहे.
यावेळी भाजपा चिटणीस भालचंद्र साठे म्हणाले, भुईबावडा ते दिंडवणे या मार्गाचे काम लवकरच होणार आहे. हा मार्ग अस्तित्वात आल्यास वाहन चालकांना हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. सर्वेचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थामध्ये समाधान व्यक्त होत आहे. पीडब्ल्यूडीच्या अधिकृत पुणे येथील एजन्सीला हे सर्वेचे काम देण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लवकरच निधी उपलब्ध होईल. निधीची तरतूद झाल्यावर लवकरच या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.सर्वे कामाच्या शुभारंभ प्रसंगी भुईबावडा येथे भाजपा चिटणीस भालचंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच बाजीराव मोरे, सरपंच श्री पाथरे, तानाजी मोरे, मनोहर मोरे, रमेश मोरे, सूर्यकांत मोरे, अनंत मोरे, कुणाल मोरे, सूर्यकांत पांडुरंग मोरे, जितेंद्र पाटणकर, स्वप्निल मोरे, अनिल पावले, दिलीप माने, राजेश पाटणकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.