You are currently viewing राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून पेडणे तालुक्यातील पत्रकार बांधवांना कोरेगावचे सुपुत्र विष्णुदास कोरेगावकर यांनी दिल्या शुभेच्छा

राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून पेडणे तालुक्यातील पत्रकार बांधवांना कोरेगावचे सुपुत्र विष्णुदास कोरेगावकर यांनी दिल्या शुभेच्छा

*राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून पेडणे तालुक्यातील पत्रकार बांधवांना कोरेगावचे सुपुत्र विष्णुदास कोरेगावकर यांनी दिल्या शुभेच्छा*

लोकशाही राज्यव्यवस्था ही कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व प्रत्रकारिता या चार खांबांवर उभी असते. पत्रकारितेची मुख्य कामे म्हणजे उद्बोधन करणे, माहिती देणे, आणि मनोरंजन. हीच कामे चांगल्या रीतीने पार पाडता यावी यासाठी पत्रकार व वृत्तपत्र यांना स्वातंत्र्याची आवश्यकता असते. परंतु अलीकडे पत्रकारितेवर दबाव वाढत चालला आहे. एकेकाळी पत्रकारिता म्हणजे एक व्रत समजले जायचे. टिळक, आगरकर , गांधी, आंबेडकर अशा महान विभूतींनी ते दिव्य पेलले होते.


लोकशाही बळकट करण्यासाठी, एक प्रगल्भ समाज घडविण्यासाठी आणि समाजाच्या सार्वत्रिक विकासासाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत कोरगावच्या विष्णुदास कोरगावकर यांनी व्यक्त केले. पेडणे तालुक्यातील कोरगावचे सुपुत्र विष्णुदास कोरगावकर यांनी आज राष्ट्रीय पत्रकार दिनी तालुक्यातील पत्रकार बांधवांना विशेष शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत पेडणे तालुका बहुजन समाज अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश तळवणेकर हे देखील उपस्थित होते. पत्रकार दिनी जिथे इतर कुणीही पत्रकारांची आठवण काढली नव्हती तिथे श्री.विष्णुदास कोरगावकर यांनी छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, खुशीची लहर पसरली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा