You are currently viewing दोडामार्ग मध्ये उद्या “वीज ग्राहक मेळावा”

दोडामार्ग मध्ये उद्या “वीज ग्राहक मेळावा”

तालुका वासियांच्या वीज समस्या सोडविण्यासाठी व्यापारी संघाचे आयोजन

दोडामार्ग

तालुक्यातील जनतेच्या वीज समस्या दिवसेंदिवस वाढत असून ह्या मार्गी लावण्यासाठी उद्या १७ नोव्हेंबर रोजी पिंपळेश्वर सभागृह दोडामार्ग येथे वीज ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सकाळी ठीक १० वाजता सुरू होणार आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीज ग्राहकांनी आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन दोडामार्ग व्यापारी संघाने केले आहे.

वीज बिलाबाबत असलेल्या तक्रारी, बंद असलेले पथदिवे, वाढीव वीजबिले, कमी दाबाचा वीज पुरवठा, महावितरणच्या विविध योजना आदी अनेक विषयांवर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + fourteen =