योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा ६ जुलैला उपोषण…

योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा ६ जुलैला उपोषण…

सावंतवाडी :

 

आंबोली घाटातील धोकादायक दरडी तसेच गटाराचे काम अर्धवट टाकणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी बांधकामचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांच्याकडे केली आहे.

यावर तात्काळ योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अन्यथा ६ जुलैला आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. याबाबत त्यांनी आज निवेदन दिले असून ते प्रसिद्धीस दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा