You are currently viewing “बालपण देगा देवा मुगी साखरेचा र वा”

“बालपण देगा देवा मुगी साखरेचा र वा”

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बालदिन…..*

“बालपण देगा देवा मुगी साखरेचा र वा”

आज वाटतसे हेवा देशिल का फिरूनी देवा?
नाही मिळत फिरून अनमोल आहे ठेवा
नाही मागावे लागत आपसुक मिळे प्रेम
बालपण बालपण सारे काही असे क्षेम….

बालदिन करा करा आज साजरा जन हो
किती वेचती कचरा वणवण फिरती हो
शौर्य पताका दिल्लीत भिक मागती गल्लीत
कबुतरे सोडून हो सोडा सोडा जनरीत…

“गुलाब” ती बालके हो झोपडीत महालात
किती फरक पहा ना काही राहती हालात
तूप रोटी खाती काही काही पडतात फाका
त्याने घातले जन्माला, होऊ या ना “पाठीराखा”…..

एक एक हो बालक हो आहे कलाम नि बोस
देशासाठी घडवू या करू निगराणी खास
घ्याना दत्तक एखादा उचलूया त्याचा भार
पुण्यकर्म हेच आहे देशासाठी आहे सार ….

करा करा प्रण आज भार उचलीन थोडा
दत्तक त्या बालकाचा भरू ज्ञानानेच घडा
एक एक बालक हा देश माझा घडविल
पाने सोनेरी होतील देश माझा मढविल…

प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १४/११/२०२२
वेळ : सकाळी १०/१७

प्रतिक्रिया व्यक्त करा