You are currently viewing रंगीत फुले

रंगीत फुले

*जागतीकसाहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम बालगीत*

*(बालगीत)* *रंगीत फुले* 🌹
बागेत मुलांनो जावु या
रंगीत फुले पाहु या !

लाल गुलाब डोलतो पहा
काट्या पासुन दुरच रहा !

पांढरा शुभ्र मोगरा
आईला ओवुया गजरा !

पिवळी पिवळी शेवंती
तबकात तिची शोभा किती !

जुई बाई नाजुक छान
वेलीवरती मुरकते मान !

पिवळा, केशरी झेंडु गर्द
नवरात्रीत माझाचं गंध

प्राजक्ताची फुले टपटप
अंगणात चला वेचु पटपट

रातराणी दिसते खुलतांना
चांदण्या रात्री हसतांना

जाईच्या त्या शुभ्र कळ्या
कमानी वरती झोपी गेल्या

निशिगंधाचा न्यारा ठेका
वाऱ्यावरती घेतो झोका !

लाल लाल जास्वंदी म्हणते
गणरायाला मीच आवडते

अबोलीचं फुलं नाजुक
बोलणे त्याला नाही ठावुक !

बकुळी बाई सुस्तावलेली
कोरंटी संगे हिरमुसलेली !

सदाफुली ‘डोल डोलते
वाऱ्या सवे नृत्य करते !

सोनचाफा सुगंधी छान
देव पुजेस त्याचा मान!

एवढी फुले रंगवताना
बाप्पाला कसे जमले ना? !

प्रश्न पडतो मजला भारी
कसा आहे? अवलिया रंगारी?

देव बाप्पाची किमया न्यारी
म्हणुन त्याला आपण प्यारी!

चला, तर बागेत जावु या
फुलांशी मैत्री करू या ***

*शीला पाटील. चांदवड.*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा