You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०३ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

__________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०३ वे

अध्याय – १८ वा , कविता- १ ली

___________________________

श्री गणेशास वंदन । श्री सद्गुरूंना नमन । श्री कुलदेवतांना

स्मरून । करितो क्रमशः लेखन- अठराव्या अध्यायाचे ।।१।।

 

श्री गजानन स्वामींचा । उपदेश सर्व-कल्याणाचा । घ्यावा बोध याचा । भक्तजन हो तुम्ही ।। २।।

 

अठराव्या अध्यायात । होई सुरुवात । आरंभी कथा यात ।

स्वामींच्या दोन भक्तांची ।। ३ ।।

 

स्वामींच्या या भक्ताचे । बायजा नाव असे साचे ।मनो,काया,वाचे ।ही करी भक्ती समर्थांची ।। ४ ।।

 

मुंडगावीचे शिवराम, भुलाई । हे असे बायजेचे बाबा-आई ।

केली लहानपणीच बायजेच्या लग्नाची घाई । ही बायजा

जाहली तरुण ।। ५।।

 

शिवराम घेउनी गेला । बायजा-कन्येला । जावयाच्या घराला । गर्भधान करण्याप्रत ।। ६ ।।

 

शिवरामास वृत्त हे कळले । जामात त्याचे षंढ निघाले।

पोरीचे जीवन उध्वस्त झाले । होई अपार दुःख माता-पित्याला ७।।

 

बायजेची आई । भुलाई, करी घाई । बोले- काय हे विपरीत बाई । लावू लग्न दुसरे आपल्या पोरीचे ।। ८।।

**********

करी क्रमशः लेखन कवी- अरुणदास

___________________________

कवी- अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा