You are currently viewing गर्दीत मी एकटा

गर्दीत मी एकटा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गर्दीत मी एकटा*

 

भोवतालच्या भोवर्यात सापडलो

गर्दीत मी हरवले एकटाच राहिलो

वाटे चोहोबाजूंस समुद्र माणसांचा

नाही कुणा ध्यास मज भेटण्याचा

🌹🌹

चौपाटी वरी उसळती लाटा अनेक

दगडावरी आढळून जाता प्रत्येक

जाणवे त्यांना हीदुनियेची ही रीत

नाही कुणी कुणाचे ,फसवीच प्रीत

🌹🌹

फेसाळ त्या समुद्रा येई उगी भरते

दुधाळत्या लाटांनी त्याचेभरे उर ते

मैत्री करू पाही, या वेड्या गर्दीशी

मस्तीत धुंद सारे बेभान रे स्वतःशी

🌹🌹

गर्दीत चालताना वाटे सभोवताली

ही माणसे कितीतरीमाझीच झाली

सागरावरी भेटतील किती हे लोक

परी ना जाणवली, जगण्याचीमेख

🌹🌹

आनंदाचे डोही मना ठेविले ज़खडू

कळून चुकले जग हे कितीआखडू

गरज असता कुणी मदतीस नायेई

गर्दीत एकटेपणाचीच सवय हो़ई

 

👆👆👆👆👆👆👆👆

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

मुंबई । विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा