You are currently viewing तुझी राधा

तुझी राधा

माझी लेखणी साहित्य मंचच्या संस्थापिका कवयित्री आम्रपाली घाडगे…आमु यांची राधा कृष्णाच्या प्रीतीवर लिहिलेली अप्रतिम काव्यरचना

*सावळ्याच्या प्रीतरंगीं राधा गेली रंगुनी*
*कृष्णमय झाली देहभान विसरुनि*

*छंद मनी लागला कृष्ण सावळ्याचा*
*बावरे होई मन ऐकून सुर पाव्याचा*

*रासरंगी तल्लीन राधा सखा हरी संग*
*पायी नुपूर वाजता कृष्णा होतसे दंग*

*हृदयी मूर्ती कृष्णाची राधा नित्य पुजते*
*स्पंदनात चित्तचोर हरीला अनुभवते*

*ओढ मनी प्रीतीची,अधीर होई भेटीस*
*कृष्णासख्या पाहण्या जीव कासावीस*

*न्यारी प्रीत न्यारी रीत जगावेगळी झाली*
*एकजीव दोन प्राण,विरहाचि वेळ आली*

*कर्तव्याची ठेवुन जाणं कृष्ण गेला दूर*
*राधेच्या मनी प्रीत नयनी आसवांचा पूर*

*आम्रपाली…*

प्रतिक्रिया व्यक्त करा