कणकवली नगरपंचायतच्या गार्डन आणि स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांच्या हस्ते संपन्न..

कणकवली नगरपंचायतच्या गार्डन आणि स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांच्या हस्ते संपन्न..

 

कणकवली :

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायतच्या गार्डन आणि स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्सचे आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी निलमताई राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते.

भालचंद्र महाराज मठाशेजारी कांबळी गल्ली येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गार्डन आणि स्पोर्ट्स क्लबचे कणकवलीवासीयांचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. एकूण ७४ गुंठे क्षेत्रात गार्डन आणि स्पोर्ट्स क्लबचा भव्य प्रकल्प साकारतोय आणि यासाठी एकूण १५ कोटींच्या प्रकल्पापैकी साडेचार कोटींच्या फेज वन प्रकल्पाचे आज भूमिपूजन झाले. साडे अकरा गुंठे क्षेत्रात रमणीय गार्डन तर साडे बासष्ट गुंठे क्षेत्रात स्पोर्ट्स क्लब कॉम्प्लेक्स उभे राहणार आहे. कणकवली शहराच्या पर्यटनाचा हे गार्डन आणि स्पोर्ट्स क्लब मानबिंदू ठरणार आहे.

यावेळी गटनेते तथा बांधकाम सभापती संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, नगरसेवक बंडू हर्णे, अभि मुसळे, विराज भोसले, शिशिर परुळेकर, नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मेधा सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष राजन चिके, रोटरी क्लब अध्यक्ष लवू पिळणकर, जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण, बबलू सावंत, संदीप नलावडे, विठ्ठल देसाई, राजन परब, अण्णा कोदे, गीता कामत, संदीप वालावलकर तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शासकीय मेडिकल कॉलेजच्या केवळ थापा आहेत, मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी एमसीआयची मंजुरी लागते. राज्य सरकारला अधिकार नाहीत. एकमेकांना पेढे भरवून शिवसेनेची नेतेमंडळी जनतेची दिशाभूल करताहेत. असा खासदार नारायण राणे यांनी यावेळी घेतला.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि पुरेसा स्टाफ नाही. आधी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करा. पडवेतील मेडिकल कॉलेज पूर्ण सक्षम आहे. आमच्या हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर आणि अन्य स्टाफ सिंधुदुर्ग वासीयांचे आरोग्य जपण्यासाठी सक्षम आहेत, मुख्यमंत्री सोलापूर दौरा करून काय देणार? मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये समजत नाहीत. कोरोना काळात घरातून बाहेर पडले नाहीत? राज्याला निष्क्रिय मुख्यमंत्री लाभलाय. अशी जहरी टिका खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली.

अतिवृष्टीने त्रस्त शेतकन्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाही आहे. सरकारची तिजोरी खाली आहे. शेतकऱ्यांना हे सरकार न्याय देऊ शकत नाहीत. असा राणे यांनी शिवसेनेवर टोला लगावला.

कणकवलीतील गार्डन स्पोर्ट्स क्लब जिल्ह्यात उजवे ठरेल व या स्पोर्ट्स क्लबमधून जिल्ह्यात जलतरण आणि इनडोअर खेळाडू घडतील. असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी भूमिपूजनानंतर व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा