You are currently viewing सावंतवाडी मळगाव घाटीत दुचाकी अपघातात दोन युवक जखमी

सावंतवाडी मळगाव घाटीत दुचाकी अपघातात दोन युवक जखमी

सावंतवाडी :

 

सावंतवाडी रेडी मार्गावरील मळगाव घाटीत रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडीवर आदळल्यामुळे अपघात झाला आहे. यात दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. आज शनिवारी हा अपघात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. हेमंत गजानन शिरोडकर (वय २१), वैभव गजानन शिरोडकर (वय २३) दोघे ही रा. मळगाव कुंभारवाडी अशी त्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, अपघातानंतर बराच वेळ दोघेही रस्त्यात पडून होते.

मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मळगाव येथील रहिवासी प्रा. शरद शिरोडकर यांनी स्वतःच्या वाहनातून त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. तर वैभव याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी पाठवण्यात आले.

दोघेही युवक कामानिमित्त कणकवली येथे गेले होते. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी ते सावंतवाडीत येत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला दरडीवर आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, या अपघातात एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान अपघातानंतर त्या ठिकाणी असलेले मनसेचे पदाधिकारी कौस्तुभ नाईक, बाबुराव खडपकर आदींनी मदत कार्य करत प्रा. शरद शिरोडकर यांच्या वाहनातून जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर या ठिकाणी प्राथमिक उपचार करून एकाला अधिक उपचारासाठी गोवा-बांबूळी येथे हलविण्यात आले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात माजी सभापती राजू परब, मळगावचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्यासह मळगाव ग्रामस्थ दाखल झाले होते. या अपघाताबाबत सावंतवाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − three =