You are currently viewing जिल्ह्यातील शेतकरी, तरुण-तरुणी व महिलांच्या उज्वल भविष्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक सदैव कटीबद्ध..

जिल्ह्यातील शेतकरी, तरुण-तरुणी व महिलांच्या उज्वल भविष्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक सदैव कटीबद्ध..

बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी यांचे मळगांव येथे संपन्न सत्कार प्रसंगी आश्वासन..

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, तरुण-तरुणी व महिलांनी नवे उद्योग निर्माण करावेत. नोकरी शोधत भटकंती करण्यापेक्षा उद्योग व्यवसायातून रोजगार मिळवून भवितव्य घडवावे यासाठी सिद्ध जिल्हा बॅंक नेहमीच कटीबद्ध राहील असे आश्वासन देताना सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी यांनी

,ज्यांना बॅकेचे कर्ज हवे असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा.आपण त्यासाठी सदैव तत्पर राहीन,असे आश्वासन मळगांव येथे बोलताना दिले.ते शनिवारी मळगांव येथे मळगांव ग्रामस्थ व सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांच्या मळगांव येथील निवासस्थानी संपन्न स्वागत व सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी व नवनिर्वाचित संचालक महेश सारंग यांचा सत्कार मळगांव भा. ज. प व ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी मळगांव येथे करण्यात आला.

या सत्कार प्रसंगी बॅकेचे माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, सावंतवाडी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब,मळगांवच्या सरपंच स्नेहल जामदार,निरवडेचे माजी सरपंच प्रमोद गावडे, मळगांवचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर , माडखोलचे सरपंच बाळू शिरसाट,मळगांव तंटामुक्ती समिती अध्यक्ष निलेश कुडव, महिला कार्यकर्त्या गीता परब, सुभद्रा राणे व श्रुती रेडकर तसेच मधुकर देसाई,आत्माराम गावडे,प्रसाद नाईक, निलेश चव्हाण, मनोहर राऊळ, उदय जामदार, दिपक जोशी,निलकंठ बुगडे, तेजपाल सावळ , रामदास राऊळ,प्रकाश राऊळ,बाळा जाधव, भरत जाधव, प्रकाश जाधव, राजन जाधव व आदी उपस्थित होते.

मनिष दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅक ही शेतकरी, कष्टकरी यांची बॅंक आहे. त्यांच्या हक्काची बॅक आहे. त्यामुळे या बॅंकेचा प्रत्येक लाभ त्यांना सर्वात प्रथम मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी तसेच युवक-युवतींनी व महिलांनी बॅंकेच्या प्रत्येक योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी लवकरच केंद्रीय सुक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असलेल्या प्रशिक्षण मेळाव्याचा फायदा घ्या असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =