You are currently viewing सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचा 15 पैकी 15 जागांवर विजय

सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाचा 15 पैकी 15 जागांवर विजय

काँग्रेस-राष्ट्रवादी सह उद्धव ठाकरे शिवसेनेचा धुव्वा…

 

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघ निवडणूकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या श्रीदेव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलने विरोधी ठाकरे सेनेच्या सहकार वैभव पॅनलचा १५ -० असा दारुण पराभव करीत एकतर्फी दणदणीत विजय प्राप्त केला. युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.

श्री देव पाटेकर सहकार परिर्वतन पॅनलचे उमेदवार प्रमोद गावडे, आत्माराम गावडे, प्रवीण देसाई, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, प्रमोद सावंत, प्रमोद गावडे, सोनू गावडे, ज्ञानेश परब, राघोबा राऊळ, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, सोनू जाधव, नारायण हिराप हे सर्व उमेदवार विजयी झाले. तर दत्ताराम कोळंबेकर हे आधीच बिनविरोध निवडून आले होते. यामुळे भाजपा बाळासाहेबांचे शिवसेना युतीचा हा फार मोठा विजय मानला जात आहे.

संस्था मतदार संघात युतीचे प्रवीण देसाई (२७), आत्माराम गावडे (२७), दत्ताराम हरमलकर (२७), प्रभाकर राऊळ (२६), रघुनाथ रेडकर (२५), प्रमोद सावंत (२६) यांचा विजय झाला. तर व्यक्ती मतदार संघात प्रमोद गावडे (३२५), शशिकांत गावडे (२८६), ज्ञानेश परब (२९६) व विनायक राऊळ (२७८) यांचा विजय झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा