You are currently viewing बांदिवडे येथे गोंधळ उत्सवाच्या औचित्यावर गुणवंतांचे सत्कार

बांदिवडे येथे गोंधळ उत्सवाच्या औचित्यावर गुणवंतांचे सत्कार

बांदिवडे प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष प्रा. सोनू सावंत यांच्या वतीने साहित्य वाटप

मालवण :

 

बांदिवडे येथील श्री देवी पावणाई भगवती मंदिर येथे दुसऱ्या वार्षिक गोंधळ कार्यक्रमाचे औचित्य साधून दहावी व बारावी परीक्षा गुणवंत विध्यार्थी, व अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप माध्यमिक शिक्षक सोनू सावंत यांच्या वतीने करण्यात आले.

मुंबई येथील ज्ञानसागर विद्यालयाचे शिक्षक व बांदिवडे प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष सोनू सुधाकर सावंत यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दहावी व बारावी गुणवंत विध्यार्थ्यांसह त्यांच्या आई- वडील यांचा सत्कार करण्यात आला. बांदिवडे येथील शर्वरी प्रशांत परब हिची राज्य हॉलीबॉल संघात निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी विश्वनाथ परब यांनी सोनू सावंत यांच्या दातृत्वा बद्दल आभार मानताना सावंत सर यांचे दातृत्व आदर्शवत असल्याचे सांगितले.

यावेळी उद्योजक डॉ दीपक परब, सरपंच आशु मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडी, सदस्य नारायण परब, स्वप्नील मुणगेकर, श्री. साई प्रभु, प्रफुल्ल प्रभू, आप्पा गोविंद परब, उद्योजिका सौ राधिका परब, जयेश परब, दिनेश परब, मधुकर परब, आनंद परब, नारायण परब, चंद्रकांत परब, सागर परब, अनिल परब, मनोहर परब, उदय सावंत, आबा आईर, पोलीस पाटील नरेश मसुरकर, राजेंद्र परब,जगन्नाथ परब, शिवराम परब, वासुदेव सावंत, अशोक परब, प्रवीण परब, प्रथमेश नाईक, राजेश दळवी सिताराम परब, प्रकाश परब, लाडोबा परब, प्रवीण परब, के.के. सावंत, प्रतीक परब, नरेंद्र जाधव, नयन भट, विनय सावंत, नितीन परब, अशोक परब, उल्हास परब, चंद्रशेखर परब, रमेश परब, गणपत सावंत, अनुराधा गावकर, प्रशांत परब, उदय परब, विकास भट, मंगेश चव्हाण, यशवंत परब, उत्तम परब, शैलेश राणे, सुधीर घाडी आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन विश्वनाथ परब तर आभार आनंद परब यांनी मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा