You are currently viewing घोटगे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत मणेरी स्वराभिषेक मंडळ प्रथम

घोटगे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत मणेरी स्वराभिषेक मंडळ प्रथम

दोडामार्ग

घोटगे येथील हरिनाम सप्ताह निमित्त आयोजीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
घोटगेत सलग 18 वर्षे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय किवा खुली भजन स्पर्धेच आयोजन श्री देवी सातेरी मंदिरात केले जाते.यावर्षी जिल्ह्यस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत 11 भजन मंडळानी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे उदगाटन दोडामार्ग पोलिस उप-निरीक्षक जयेश ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्पर्धा परिक्षक नीलेश मेस्त्री,अनिल च्यारी,देवाचकारी सुरेश दळवी,हेडकॉन्सटेबल संजय गवस,शिक्षक जनार्दन सुतार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित दळवी तर आभार भरत दळवी यानी मानले.तसेच बक्षिस वितरण समारंभ हरिनाम सप्ताह सांगता वेळी ग्रामस्थाच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी ठरला. द्वितीय क्रमांक श्री सातेरी पुर्वावतारी भजन मंडळ माठणे याने मिळविला.तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पाडलोस याने मिळविले.

 


उत्तेजनार्थ बक्षिस श्री शांतादुर्गा सिध्देश्वर भजन मंडळ खोक्रल याला मिळाले.तसेच शिस्तबद्ध संघाचे पारितोषिक श्री. देवी माऊली भजन मंडळ कोलझर याने पटकाविले.उत्कृष्ट गायक – गितेश कांबळी(मणेरी),उत्कृष्ट हर्मोनियम – समीर नाईक(मणेरी),उत्कृष्ट तबला- जाणू शिरवलकर(माठणे) उत्कृष्ट पखवाज- रामा गवस (पाडलोस) याना बक्षिसे मिळाली.
यावेळी स्पर्धेचे परिक्षण तबला व हार्मोनियम विशारद नीलेश मेस्त्री ,अनिल च्यारी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − seven =