You are currently viewing आम.वैभव नाईकांचे स्वताच्या अपयशाचे खापर अधिकारी वर्गावर फोडण्याचे काम – अमित इब्रामपूरकर

आम.वैभव नाईकांचे स्वताच्या अपयशाचे खापर अधिकारी वर्गावर फोडण्याचे काम – अमित इब्रामपूरकर

आम.वैभव नाईकांचे स्वताच्या अपयशाचे खापर अधिकारी वर्गावर फोडण्याचे काम – अमित इब्रामपूरकर

कुंभारमाठ येथील रहिवाशांच्या भितीपोटीच आमदार सा.बां.कार्यालयात..!

सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कामे महिनोन् महिने रेंगाळत ठेवतात असा बेजबाबदारपणाचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. सत्तेच्या गुर्मीत असताना नवीन रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला खड्डे बुजवण्यासाठी निधी आणला अशा फसव्या घोषणा केल्या आणि आता सत्ता गेल्यानंतर साडेतीन महिन्यानंतर अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे चेपण्याचा प्रकार आमदारांकडून होत आहे.असा सणसणीत आरोप मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ते म्हणतात मनसेने खड्ड्यांप्रश्नी सातत्याने आवाज उचलला त्यावेळी नाईकांनी डोळ्यावर पट्टी बांधली होती का? सत्ता गेल्यानंतर कामे दर्जेदार करा,तातडीने करा असे आम.म्हणत असतील तर या अगोदर आमदार नुसत्या घोषणा करत होते घोषणा पलीकडे काय झाले? तेव्हा अशी त्यांना अपेक्षित दर्जेदार कामे होत होती का ? आज जी कामे होत नाहीत ती कामे यापूर्वी होत होती काय ? आमदारांच्या काळात झालेली सर्व कामे निकृष्ट आहेत ती दर्जेदार होण्यासाठी काय प्रयत्न केले ?आताच प्रचिती कशी आली ? मातोश्री पाणीधन योजनेचे पुढे काय झाले ते आमदार वैभव नाईकांनी सांगावे.त्यामुळे स्वताच्या अपयशाचे खापर अधिकारी वर्गावर फोडण्याचे काम आमदार करत आहेत.ज्या कार्यालयात अधिकाऱ्यांवर आरोप केला त्या मालवण सार्वजनिक बांधकाम कार्यालयात शाखा अभियंता ३ पदे,क्लार्क २ पदे,ड्रायव्हर १ पद,रस्त्यांची कामे सुरु असताना दर्जेदार होण्यासाठी लागणारा मुकादम वर्ग सर्व ५ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी आमदारांनी सत्तेत असताना काय प्रयत्न केले ? ते सांगावे

काळसे,बेळणे,सागरीमहामार्ग,कसाल-मालवण रस्ता या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे.याला लोकप्रतिनिधी म्हणुन आमदार जबाबदार आहेत.कुंभारमाठ येथील रहिवाशांनी जरीमरी मंदिराच्या बाजूस असलेल्या कसाल मालवण रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी बांधकाम विभागाला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिल्याने भीतीपोटी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयास भेट देण्याची नौटंकी केली असल्याचेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा