जिल्हा राष्ट्रवादीची मागणी; कुडाळ पोलिसांना निवेदन…
कुडाळ
खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर हवामान कारक टीका करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून कुडाळ पोलिसांकडे करण्यात आली आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीसह महिला वर्गात असंतोष पसरला आहे. त्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी व्हावी, अशी मागणीही होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुद्धा या संदर्भात योग्य ती पाऊले उचलावी, असेही यावेळी सांगण्यात आले. याबाबत त्यांनी आज कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर,जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, तालुका अध्यक्ष शिवाजी घोगळे, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर शेख, तालुका उपाध्यक्ष अनिल कानडे, संकेत शिंदे आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.