You are currently viewing कोनाळकट्टा येथे स्विफ्ट कारची संरक्षक भिंतीला धडक; कार व भिंतीचे नुकसान

कोनाळकट्टा येथे स्विफ्ट कारची संरक्षक भिंतीला धडक; कार व भिंतीचे नुकसान

दोडामार्ग

दोडामार्ग ते तिलारी विजघर राज्यमार्गावर घाट माथ्यावरुन दोडामार्गच्या दिशेने जाणारी (एम एच 12 एम एफ 7335 )या स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कोनाळकट्टा येथोल रस्त्यांच्या बाजुला असलेल्या विनायक पांगम यांच्या घरसमोरील संरक्षक भिंतीवर जोरात धडक बसल्याने अपघात झाला.

यात भिंतिचे नुकसान झाले.तर गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.सदरची घटना आज सकाळी 7 च्या दरम्यान घडली परंतू या गाडीतून प्रवास करणारे तिन्ही प्रवाशी मात्र बाल बाल बचावले.त्या तिन्ही प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झाली त्याना सुखरुप पणे गाडीतून बाहेर काढण्यात आल्याचे तेथील सामजिक कार्यकर्ते परेश पोकळे उपसरपंच प्रीतम पोकळे यानी सांगितले.

यावेळी त्या ठिकाणी योगेश पांगम रोशन आरोलकर आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + sixteen =