You are currently viewing चिपी विमानतळावर कोल्हा आल्याने लँडिंग रखडले

चिपी विमानतळावर कोल्हा आल्याने लँडिंग रखडले

विमानतळ यंत्रणेची तारांबळ

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालं आणि या विमानतळावरून विमान सेवा सुरू झाली. परंतु, एका घटनेमुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या या विमानतळावर दहा मिनिटांसाठी लँडिंग रखडले होते.

मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरटय़ा घालण्याची वेळ आली. यासाठी कारण ठरला कोल्हा. धावपट्टीवर अचानक आलेल्या कोह्यामुळे यंत्रणेचीही तारंबळ उडाली.

सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्यानंतर या विमानतळावरील विमानांच्या प्रवासाला गालबोट लागले. सोमवारी सकाळी अचानक एक कोल्हा धावपट्टीवर आला. चिपी विमानतळाच्या जवळपास कोह्यांचा कळप असल्याचे समजते. धावपट्टीवर आलेल्या कोह्यामुळे मुंबईहून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे आकाशात घिरटय़ा माराव्या लागल्या.
धावपट्टीवर कोणतातरी प्राणी असल्याचे विमानाच्या पायलटला समजताच त्यांनी तात्काळ सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधून विमान पुन्हा आकाशात नेले. संबंधित सुरक्षा यंत्रणेला धावपट्टीवर कोल्हा असल्याचे समजताच त्यांनी कोह्याला बाहेर काढण्यास सांगितले. या कोह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये सुरुवातीला भीती निर्माण झाली होती. मात्र नंतर विमानाचे लँडिंग व्यवस्थित झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा