वेंगुर्ले
तालुक्यातील अणसूर येथील श्री देवी सातेरी कला – क्रीडा मंडळ , अणसूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय भव्य संगीत महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . यावेळी घेण्यात आलेल्या खुल्या फुगडी स्पर्धेत सखी फुगडी संघ , पावशी यांनी तर वारकरी भजन स्पर्धेत श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ , मूठ – वेंगुर्ला यांनी विजेतेपद पटकावले .
या संगीत महोत्सवाचे उदघाटन २८ ऑक्टोबर रोजी मंडळाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते , उद्योजक रंगनाथ उर्फ नाथा गावडे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी गोपी गावडे , चंद्रकांत विष्णू गावडे , सरपंच अन्विता गावडे , उपसरपंच संजय गावडे , सामाजिक कार्यकर्ते सत्यविजय गावडे , गणेश गावडे , विजय सरमळकर , वक्रतुंड ज्वेलर्सचे मालक भाऊ मालवणकर , पांडू गावडे , चंदू गावडे , नारायण ताम्हणकर , मंडळाचे अध्यक्ष नितीन अणसुरकर ,उपाध्यक्ष सुनील गावडे , खजिनदार सिद्धेश गावडे , नारायण विश्राम गावडे , महादेव भालचंद्र गावडे , बिटू गावडे , कौस्तुभ गडकर , विजय धर्माजी गावडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते . उद्घाटन समारं भानंतर कोल्हापूर नृसिंहवाडी येथील ह . भ . प . शरद बुवा घाग यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले . व दिनांक २ ९ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या फुगडी स्पर्धेत सिंधुदुर्ग व गोवा येथील नामांकित ९ संघांनी सहभाग घेतला होता . यात सखी फुगडी संघ , पावशी यांनी प्रथम , श्री भैरव जोगेश्वरी फुगडी संघ , कुडाळ यांनी द्वितीय , ओंकार सिद्धेश्वर फुगडी संघ , उभादंडा यांनी तृतीय क्रमांक पटकावले . शिस्तबद्ध मंडळ म्हणून श्री सातेरी फुगडी ग्रुप , पेडणे – गोवा उत्कृष्ट गायक / कोरस म्हणून तारदेवी फुगडी मंडळ , केळुस तर उत्तेजनार्थ क्रमांक श्री देव वाटेराम महापुरुष फुगडी संघ , पालये – गोवा यांना देऊन गौरविण्यात आले . तसेच दिनांक ३० ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या वारकरी भजन स्पर्धेत नामांकित ९ वारकरी भजन मंडळांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेत श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ , मूठ वेंगुर्ला यांनी प्रथम , महापुरुष वारकरी भजन मंडळ निवती यांनी द्वितीय तर दत्तप्रसाद वारकरी भजन मंडळ , डिचोल करवाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावले . शिस्तबद्ध मंडळ म्हणून श्री देव वेतोबा वारकरी भजन मंडळ कोचरा , उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून प्रवीण उमेश डिचोलकर ( दत्तप्रसाद वारकरी भजनमंडळ ) , उत्कृष्ट गायक म्हणून गणंजय सावंत ( श्री केपादेवी वारकरी भजन मंडळ ) तर उत्तेजनार्थ क्रमांक अचानक वारकरी भजन मंडळ , वेंगुर्ला यांना देऊन गौरविण्यात आले . दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . या संगीत महोत्सवाचे औचित्य साधून प्रसिद्ध भजनी कलाकार दीप्तेश मेस्त्री व तेजस मेस्त्री यांचा तर पश्चिम बंगाल येथे संपन्न झालेल्या ३१ व्या ऑल इंडिया जी . व्ही . मावळंकर शूटिंग चॅम्पिअनशिप स्पर्धा ( रायफल ) या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत ४०० पैकी ३८१ गुणांची नोंद करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के करणाऱ्या वेंगुर्लेतील कन्या सानिया सुदेश आंगचेकर यांचा सत्कार करण्यात आला . तसेच भाऊ मालवणकर व उदय मालवणकर यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या लकी ड्रॉ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . स्पर्धेचे सूत्रसंचालन राजा सामंत व गजमुख गावडे यांनी केले .