You are currently viewing मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रचाराचा शुभारंभ

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रचाराचा शुभारंभ

मालवण :

 

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या 13 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी विकास पॅनेलने मालवण देऊळ वाडा येथील श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी देवतांना श्रीफळ ठेवून साकडे घालत प्रचाराचा शुभारंभ शनिवारी केला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांसह भाजपा पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार संस्था मतदार संघ कृष्णा चव्हाण, राजन गावकर, महेश मांजरेकर, प्रफुल्ल प्रभू, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई. व्यक्ती मतदार संघ : विजय ढोलम, महेश गावकर, गोविंद गावडे, रमेश हडकर.

अनुसूचित जाती जमाती : सुरेश चौकेकर. इतर मागास वर्ग : कृष्णा ढोलम. भटक्या विमुक्त जाती जमाती : अशोक तोडणकर. महिला जागा : सरोज परब, अमृता सावंत आदी उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक जगदीश गावकर, बबलू राऊत, शिवाजी परब, कासवकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजप पुरस्कृत पॅनेलला तालुक्यात सर्वत्र मिळणारा प्रतिसाद पाहता सर्व विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − nine =