You are currently viewing फोंडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक खंडित

फोंडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक खंडित

फोंडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक खंडित

फोंडाघाट

कालपासून सुरू झालेल्या संततदार पावसामुळे सुरक्षित असलेला फोंडाघाटात ६२/६६०० किलोमीटर रस्त्यावर ,सकाळी १०च्या दरम्यान दरडी कोसळण्यास सुरुवात झाली. दरडीचे दगड, मलबा, माती रस्त्यावर पसरल्याने वाहतूक बंद झाली.

रस्ता बंद झाल्याचे समजताच नेहमी घाटात हजर असणारे ट्राफिक पोलीस कार्यरत झाले. बांधकाम विभागाला रस्ता बंद झाल्याचे वृत्त समजताच उपकार्यकारी अभियंता प्रभू मॅडम, अधिकारी अभियंता पवार-कांबळी तसेच कर्मचारी शाहू शेळके, पावसकर, सावंत इत्यादींनी घटनास्थळी धाव घेऊन पवन भालेकर यांच्या जेसीबी द्वारे दरडी हटवून एक मार्ग खुला केला. मात्र घडणीवरून पाझरणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे, दरडी कालांतराने कोसळत होत्या .यादरम्यान कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे,खारेपाटण तलाठी अरुणा जयानावर यांचे सह अधिकारी वर्गाने, दरडी कोसळत असलेल्या ठिकाणची पाहणी करून दीक्षांत देशपांडे यांनी संबंधितांना एक मार्ग वाहतूक सुरू करण्यासाठी सूचना केल्या. त्यांचे समवेत फोंडा मंडळ अधिकारी नीलिमा प्रभू ,कोतवाल पांडुरंग राणे इत्यादी होते.

साधारण बारा ते एकच्या दरम्यान रस्त्यावरील दरडी बाजूला करून खोळंबलेली वाहतूक एक मार्गाने सुरळीत करण्यात आली. मात्र सतत पाऊस झाल्यास रस्ता रुंदीकरणामुळे घळणी मोकळ्या झाल्याने, दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .यावर बांधकाम विभाग आणि ट्राफिक पोलीस लक्ष देऊन आहेत….

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा