You are currently viewing फटाके नको, पुस्तक हवे,’ असा नारा देत दिवाळी साजरी

फटाके नको, पुस्तक हवे,’ असा नारा देत दिवाळी साजरी

इचलकरंजी

इचलकरंजी येथील संविधान संवादक दामोदर कोळी यांनी विवेकी पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला. ‘फटाके नको, पुस्तक हवे,’ असा नारा देत घरात विविध पुस्तकांची पूजा केली. दिवाळीच्या निमित्ताने घरात एका वेगळ्या पद्धतीने विचारांची दिवाळी साजरी केली.

वाचलेली महामानवांची पुस्तके, नाटकाची पुस्तके, संविधानाचा विचार अशी सर्व पुस्तके घरात सजवली, जेणेकरून या सगळ्या गोष्टी इतरांनाही समजतील. दिवाळीमध्ये सगळ्यांकडे पैशाची संपत्ती असते ती पूजा मांडली जाते, मात्र दामोदर याने या पुस्तकांची संपत्ती अधिक महत्त्वाची असून, पुस्तकांची पूजा केली. तसेच पर्यावरण संरक्षण करणे हे कर्तव्य मानत याचा -जागर करत फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांनी या विधायक उपक्रमास भेट दिली. केलेली पुस्तकांची सजावट, लावलेल्या पोस्टरबाबत कौतुक केले. संविधान संवादक अमोल पाटील, रोहित दळवी, श्रेयस बदडे, प्रथमेश ढवळे, साद चाँदकोटी, स्नेहल माळी, रुचिता पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 20 =