*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम लेख*
*भाऊबीज*
भाऊबीज म्हटली की दिवाळीतील महत्वाचा दिवस. बहिण-भावाचा अनोखा सण. खूप पूर्वी महिला आपल्या सासरहून माहेरी दिवाळी करता यायची. संत तुकारामांनी सुद्धा सांगितले आहे.
दिवाळीच्या मुळा
लेकी आसावली
पाहतसे वाटुली
पंढरीची
अशीही सासुरवासीन महिला दिवाळीसाठी माहेराला यायची भाऊ मूळ लावायचा. भाऊ स्वतः तिला घ्यायला जायचा. अगदी खूप पूर्वीचा काळी तर महिला बैलगाडीत बसून माहेरी यायची. गाडीवान भाऊ पैलवानगडी बैलगाडी घेऊन यायचा.किती आतुरता होती.? बहीण-भावाच्या प्रेमात. अगदी दिवाळी संपल्यानंतर सासरहून कोणीतरी गाडी घेऊन यायचे. आणि मग बैलगाडीत बसुन अगदी मानपानाप्रमाणे ती सासुरवाडीला जायच.किती सुंदर दिवाळी सण साजरा व्हायचा?अगदी वसुबारसापासून पाडवा नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि शेवटी भाऊबीज या सणाची आतुरतेने वाट पाहायचो.
पण आता सण मुळी राहिलाच नाही. फक्त देखल्या देवा दंडवत. ना भाऊ राहिला ना मूळ राहिलं. ना बैलगाडी राहिली ना दिवाळी. सणाची ओढ राहिली नाही. अगदी टिपिकल दिवाळी साजरी होऊ लागली.सुट्टया असतील तेवढ्या पुरता सण. पूर्वी पणत्यांच्या, दिव्यांच्या, उजेडात लखलखाटात दिवाळी साजरी व्हायची. आता आपण बघतो झगमगाट,रंगीत दिवे अगदी डोळे दिपून जातात. नकोसे वाटतात ते फटाके. नकोसे वाटतात ते लाईट्स. त्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचे अबालवृद्धांना किती त्रास होत असेल? याचाही विचार होत नाही. एक हजाराची लड लागण्यापेक्षा एक हजार रुपये एकदा गरिबाला दिला तर त्याची बिचाऱ्याची दिवाळी साजरी होईल पणएवढं मोठं मन आहे कोणाचं इथं? तसं होतच नाही.
असो. आपण भाऊबीज बघूया भावाला तरी कुठे आताशी सवड आहे बहिणीला मूळ लावायची. आता फोनवर बोलावले जातं. फोनवरच बहीण येते. आणि फोनवरूनच परत जाते. अलीकडे तर बऱ्याच वेळेला बऱ्याच बहिणींचे भाऊ अमेरिकेला किंवा परदेशात स्थायिक झाले त्यामुळे बहीण-भावाचं नातंचं उरलं नाही. त्या भावाला ना बहिणीची आवड ना आई-वडिलांची. तो परदेशात राहतो. तिथूनच मेसेज करतो. *हॅपी दिवाली*.अगदी आपल्या संस्कृती प्रमाणे शुभ दीपावली म्हणतं नाही. स्टेटस असतो ना? बऱ्याच ठिकाणी आई वडील गेली असतील तर त्या बहिणीला बोलावण सुद्धा होत नाही. आता कोरोनाच्या या काळात माझ्यासमोरचं उदाहरण. आई-वडील गेले म्हणून भावाने बहिणीला बोलावले सुद्धा नाही. अरेरेरे काय ही दुर्दशा बहिणीची. इतकी रडली ती मजजवळ. असं कधी असतं का? बहिणीला न बोलावण म्हणजे हा किती मोठा तिचा अपमान आहे?तिची सासरी किती कुचंबणा होते याचा देखील विचार नाही. काय मागते ती भावाकडे?
*भाऊ माझा मानाचा*
*त्याकडे काय मागवा*
*दीड खणाची दे चोळी*
*एका रातीचा विसावा****
तिला फक्त आपला भावाचा सुखी संसार बघायचा असतो. आणि एका साडीच्या चोळीची अपेक्षा असते. बस. तरीही बऱ्याच ठिकाणी बहिणीला बोलावले जात नाही.किंवा बोलावले तर हवा तो मानपान दिला जात नाही. नाती गोती आता संपुष्टात होत चाललीत. काही भाऊ लांब असतात म्हणून बहिणीला जाता येत नाही तिला कोणी नेत नाही आणि भावाला सवड नसते. घ्यायला यायला. त्यामुळे तिची सासुरवाडी तही कुचंबणा होते.काही वेळेला भाऊजयी सुद्धा या गोष्टीला कारणीभूत असते.पुर्वी सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला मुले जात. *आता ना मामा राहिला* , *ना मामाचा गाव.ना मामाचा* *चिरेबंदी वाडा* . पूर्वी आपण सुट्टी लागलो की एक एक महिना मामाच्या गावाला जायचो. मजा करायचो. आजी-आजोबा मामाचा गाव मामाचा मळा. अगदी हक्काने राहायचो. ते मामाचं गाव आता पाहायला मिळत नाही. मामा आता शहरात स्थायिक झाला. *ना* *ती पायंदळ वाट* *राहिली. ना बैलगाडी* *राहिली. ना ते कौलारू* *घर राहिलं. आता सिमेंटच्या* *गावात एखाद कौलारू* *घर शोधावं लागतं.आता* *अमेरिकेत गेलाय मामा* . *किंवा शहरात.* आई चंदा मामा ला आपल्या मुलाचा मामा म्हणते आणि मामा म्हणून दाखवते असे सुद्धा आता वेळ आली आहे काही ठिकाणी स्थितीवरून सुद्धा वाद होत असतात परंतु त्यासाठी बहिणीच माहेर नको संपायला बऱ्याच ठिकाणी भाऊ बहिणीला बोलावतचं नाही.तिला कोणताही मानपान दिला जात नाही. वाईट हे. नको असं व्हायला समाजात. आपली भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती काय सांगते जिथे बहीण-भावाचं नातं संपत आलय तिथे समजायचं नात्यात दुरावा येत चाललाय. म्हणून अशा सणांना आजही आपण आव्हान देऊन जपलं पाहिजे. म्हणतात ना,”घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती”
*शीला पाटील. चांदवड.*
Advertisement
Web link
*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*
*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*
*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*
💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫
*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*
🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in
*☎️ बुकिंग संपर्क ☎️*
Rakhi : 9209193470.
Mahesh Bhai :9820219208.
Sharad : 8600372023.
🛑 *साईटचा पत्ता* 🛑
*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*
📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*