You are currently viewing त्या चार चौघी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

त्या चार चौघी

नवरात्राच्या साहित्य गरब्यातील रंगीत गोफाचा हा एक पदर

मंडळी…ऐका हो ऐका…आटपाट नगरातील एक मध्यमवर्गीय कुटुंब…पूर्वीची कुटुंबं म्हणजे एक परिवारच असायचा मोठ्ठा…कारण जन्म घेणारी मुलं म्हणजे देवाची देणगी आणि न्युक्लिअर फॅमिली म्हणजे केवळ एक दैवयोग असायचा…तर अशा या कुटुंबातील ह्या चार बहिणी…थोरलीचा अपवाद वगळता प्रत्येकीच्या पाठीशी एक भाऊ असणाऱ्या…

प्रत्येकीचे रंगरूप वेगळे…गुणदोष वेगळे… स्वभावही वेगळेच…कोणी कणखर, रोखठोक, कोणी हळवी, कोणी मुळुमुळु रडूबाई तर कोणी हसरी, मृदुभाषी…आपल्या एकाच हाताची पाचही बोटे तरी कुठे सारखी असतात…नाही का?
पण तरीही त्या चौघींमध्ये एक गोष्ट मात्र समान होती…त्यांची एकमेकींवरील अगदी घटृ माया…अर्थात कधी कधी भांडणं, वाद व्हायचेच…पण ते कोणात होत नाहीत! पंचपक्वान्नाच्या ताटातही चिमुटभर मीठ हवंच…हो किनई…त्यामुळे सकाळच्या उबदार उन्हात भांडणाची अभ्रं लगेच वितळुनही जायची…शिवाय कुठल्याही गोष्टीचे समान वाटे मिळाले तरीही आपल्या वाटेचे दुसरीला देण्यातच / राखुन ठेवण्यात चौघींचेही समाधान सामावलेले…

हळूहळू या चारचौघी होऊ लागल्या की हो मोठ्या…अर्थातच आधी लग्न झालं थोरलीचं आणि *मामाच्या गावाला जाऊ या* ह्या गाण्याचं रूपांतर *ताईच्या गावाला जाऊ या* कधी झालं कळलच नाही… अर्थात फक्त मजा करण्यासाठीच नाही बरं ताईचा गांव…तर ताईच्या प्रत्येक अडीअडचणीत ह्या अगदी बिनतक्रार हसतमुखाने हजर…ताईची लहान मुलं म्हणजे तर त्यांचं आनंदनिधान…

पुढे जगरहाटीप्रमाणे त्यांचीही लग्नं झाली आणि तुझं घर म्हणजे आमचं दुसरं माहेरच…असं त्यांचा एकमताने अलिखित ठराव मंजूर…अर्थात माहेरपण मात्र ताईचंच व्हायचं ही गोष्ट अलाहिदा… कारण तिला मदत करणं म्हणजे आपलं परम कर्तव्य ही त्यांची मनोभावना…लग्न झाले तरी एकमेकींवरच्या निर्व्याज मायेत मात्र तीळभरही उणेपणा आला असेल असं वाटतं…? छे…छे…उलट आता तर प्रत्येकी जवळ बोलण्यासाठी, मनातलं सांगण्यासाठी कितीतरी विषय… शिवाय प्रत्येकीजवळ हक्काचे स्वतंत्र कपडे, दागिने आणि इतर वस्तू…आणि मग या चौघींमध्येही मस्तपैकी त्यांची अदलाबदल सुरू…अगदी सोन्याची सुद्धा…हो, हो…दागिन्यांचीही…अर्थात हा एकमेकींवरील विश्वासाचा फक्त एक भाग…

पण हे पाहुन त्यांच्या घरचा स्त्रीवर्ग मात्र हैराण…कसं काय बाई तुम्ही सोनं सुद्धा दुसऱ्यांना बिनदिक्कत देता…? भीती नाही वाटत…? आम्ही तर आमच्या साड्याही…? नांव नको…असे त्यांचे अविश्वास ठासून भरलेल्या चेहेऱ्याने विचारलेले चिंताजनक सवाल…? आणि… सोनं सुद्धा…? म्हणजे…? आणि दुसऱ्यांना काय…? सख्ख्या बहिणी दुसऱ्या कशा काय होऊ शकतात…? हे ह्यांना बुचकळ्यात टाकणारे गहन प्रश्न…! असो…

पण या प्रश्नांच्या चक्रव्युहात अडकल्यामुळे हा सिलसिला थांबला…? काहीतरीच काय…अशा अनेक गोष्टी…

तर मंडळी…हा या चार-चौघींच्या
कहाणीचा इवलासा भाग…कमी जास्त मिळणाऱ्या हिश्शांवरून किंवा इतर कारणांनीही बहिणी-बहिणींत असणारे मतभेद, गैरसमज, वाद-विवाद, भांडण तंटे, रुसवे-फुगवे, अबोला याविषयी नित्य ऐकिवात आणि अनुभवास येणाऱ्या पार्श्वभूमीवर ह्या चारचौघींच्या एकमेकींवरील निरीच्छ, निरपेक्ष, निरलस मायेचा पाझर त्यांच्या पुढील
पिढीतही न उतरला तरच नवल…

मनातलं गुज सांगण्यासाठी/ऐकण्यासाठी असते बहीण…

कौतुक करण्यासाठी / करवुन घेण्यासाठी असते बहीण…

पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी /मिळवण्यासाठी असते बहीण…

चूक पोटात घेण्यासाठी / पाठीशी घालण्यासाठी असते बहीण…

आई-बाबांच्या रागापासुन बचाव करण्यासाठी असते बहीण…

धडपडु नये म्हणुन तोल सावरण्यासाठी असते बहीण…

घरामध्ये आपल्या अप्रत्यक्ष अस्तित्वाच्या खाणाखुणा जपण्यासाठी…

अ…स…ते…ब…ही…ण.

सौ. भारती महाजन रायबागकर
चेन्नई
9763204334
८-१०-२१.

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या चेन्नई स्थित ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सौ.भारती महाजन-रायबागकर यांचा अप्रतिम लेख*

*नवरात्राच्या साहित्य गरब्यातील रंगीत गोफाचा हा एक पदर…*

*त्या चार चौघी*

*अ…स…ते…ब…ही..ण*

सौ. भारती महाजन रायबागकर
चेन्नई
9763204334

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =