You are currently viewing संकल्प दसऱ्याचे …..
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

संकल्प दसऱ्याचे …..

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री, लेखिका प्रा.सौ.सुमती पवार यांचा लेख

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते महान लेखक वि. स. खांडेकर
म्हणतात …

पितृपक्ष संपला नि बायकोने घराची साफसफाई सुरू केली.
मी मोठ्या उत्साहाने म्हणालो… अहो..( हो, पूर्वी बायकांना
सुसंस्कृत म्हणवणारे लोक .. आदराने संबोधत असत ..
बायकांनी तर.. नवऱ्याचे नाव उच्चारण्याची पद्धतच नव्हती..
त्या बिचऱ्या इकडच्यां कडून, तिकडच्यांकडून म्हणत असत.)
तर .. अहो मी ह्या वर्षी तुम्हाला साफसफाईत मदत करणार
म्हटल्यावर बायकोने आश्चर्याने डोळेच विस्फारले नि म्हणाली ..बरं बरं … पुरे तुमच्या गप्पा ….
तेवढ्या माळ्यावरच्या तुमच्या ट्रंका काढून दिल्यात तरी पुरे…!

तिने हिरमोड केला तरी मी उत्साहाने माळ्यावरती चढलो तर
काय..?
अबबबबबबबब.. तिथे तर जुन्या सामानाची जत्राच भरली
होती.जुने काय काय तिथे फेकले होते याला सुमार नव्हता.
मी तर चक्राऊनच गेलो, नि तिलाच ओरडलो..
तेवढ्यात माझ्या ट्रंकांकडे माझे लक्ष गेले नि तिथे मला माझ्या
जुन्या अपुऱ्या राहिलेल्या कथा कविता कादंबऱ्या यांची सुरू
केलेली प्रकरणे, चिठ्ठ्याचपाट्या, अर्धवट लिहिलेले कागद
नि काय काय सापडले नि मी एकदम हरखून गेलो.काय आहे
ते बघावे म्हणून पहिलाच कागद उघडला तर .. त्यावर लिहिले
होते ..”आज पासून संकल्प केला आहे की .. दररोज कमितकमी चार तास तरी अभ्यास करायचा …! ऐन उमेदीत
तरूण पणात केलेला संकल्प होता तो.. तो पाहिला नि मला
हसूच आले. लगेच दुसरा कागद हाती घेतला नि वाचू लागलो..
ठरले .. आज पासून टिळकांप्रमाणे रोज व्यायाम शाळेत जाऊन तब्बेत कमवायची… नि मी खो खो करून हसू लागलो..
बायको ओरडली.. अहो काम सोडून असे एकटेच हसत काय
बसलात .? तुम्हाला सांगितले ते चुकलेच …

मी म्हणालो, तुम्ही ऐकलतं तर तुम्ही ही अशाच हसत सुटाल !
मी वेड्या सारखा तिथेच माळ्यावर वाचत सुटलो. माझ्या किती तरी संकल्पांची अशी समाधीच तिथे बांधली गेली होती.
हो, तरी मला काही त्या अपू्र्ण राहिलेल्या संकल्पांचे वाईट
वाटले नाही .. तुम्ही केलेले सारे संकल्प पूर्णत्वाला जातीलच
असे कुणी सांगितले …? आणि ते कसे शक्य आहे …? मी
केलेले अनेक संकल्प पडून असले तरी मी संकल्प पुरे केले नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही .. उदा. आज मला एक कथा बीज सुचले नि त्यावर कथा लिहायचीच असे म्हणून
लिहू लागलो. थोडी एक दोन प्रकरणे लिहित नाही तोवर मला
दुसरे कथा बीज सुचले नि मी ते सोडून दुसरीच कथा लिहू लागलो. तेवढ्यात एका कादंबरीचा आराखडा मनात तयार
झाला नि मग कादंबरी कडे वळलो . अशी मनात असलेली
अनेक कथाबीजे अडगळीत पडून राहिली .

म्हणून मी कथा कादंबऱ्या लिहिल्याच नाहीत असा त्याचा अर्थ
होतो का.. तर नाही .. एकाच वेळी अनेक कथाबीजे माझ्यामनात उमलत राहिल्यामुळे काही लिहिली तर .. काही
ट्रंकेत पडली. पण आता वाचतांना लक्षात आले की, अजूनही
मला त्यांचे तितकेच आकर्षण आहे …

म्हणजे बघा … मी अनेक कथा कादंबऱ्या लिहिण्याचे संकल्प
केले .. त्यातले पन्नास साठ टक्के संकल्प पू्र्ण झाले बाकीचे
झाले नाहीत म्हणून वाईट वाटायचे काहीच कारण नाही ..
अनेक कथा कादंबऱ्यांचे संकल्प ट्रंकेत माझी वाट पहात असले
तरी अनेक कथा कादंबऱ्या माझ्या हातून लिहून झाल्या होत्या..! म्हणून वाईट वाटूनच घ्यायचे असेल तर संकल्प
केलेच नाहीत याचे वाईट वाटायला हवे, अपुरे राहिले म्हणून नाही ..१०० संकल्प केले त्यातील ५० पुर्ण झाले तरी चालतील
पण संकल्प करायला हवेत …

शेख चिल्ली म्हणतोच ना… मी यूं करीन .. मी त्यूं करीन ..
ह्या सारखे स्वप्न बघण्यात सुद्धा किती आनंद आहे..?
हो.. आज नाही माझे काम उद्या नक्की होईल या आशेवर
किती तरी महिने सहज निघून जातात हे आपल्याला कळत
देखील नाही.. शेवटी”आशा” ही स्वप्नांची सख्खी बहिणच
आहे नाही का..? त्या आशेवरच तर आपण जगत असतो ना ..? ही आशाच नसती तर … आपले जीवन अगदी दु:ख्खमय आले असते …

म्हणून संकल्प न करण्या पेक्षा ते केलेलेच बरे.. मग त्यातील
५०/: च पूर्ण झाले तरी चालतील … कळलं का मंडळी ….?
म्हणून संकल्प केलेच पाहिजेत …
तर आजचा आपला विषय आहे दसऱ्याचे संकल्प …
एके वर्षी मी बाहेर कुठे ही न जेवण्याचा संकल्प केला होता.
बाहेर गेलो म्हणजे उगीचच आवडीचे नि नको तितके कॅलरीज
असलेले खाल्ले जाते. मी वर्षभर तो संकल्प कटाक्षाने पाळला.
घरातली मंडळी गेली तरी मी बाहेर जेवायला जात नसे.
संकल्प पाळण्यातही एक प्रकारचा आनंद असतोच.

आता , उद्या पासून मी सर्वांशी गोड बोलण्याचा व कधीही
न चिडण्याचा संकल्प करणार आहे. आपण माणसे मोठी
विचित्र आहेत. बाहेर आपली प्रतिमा खराब होऊ नये म्हणून
बाहेरच्या लोकांशी आपण गोड बोलतो नि घरात आपलं कोण
काय करून घेणार … ? म्हणून घरात उठसूठ खेकसतो.घरात
नीट वागण्याची आपल्याला गरज वाटत नाही हे किती वाईट
आहे? उलट घरात सतत ज्यांच्या बरोबर रहातो त्यांच्याशीच…
जरा गोड बोलून पहा किती खुश होतील ते …? म्हणून
परक्यांशी गोड बोलाच हो , पण घरातल्या आपल्यावर प्रेम
करणाऱ्या आपली काळजी घेणाऱ्या लोकांशी नेहमीच
गोड बोला. बघा घरातले वातावरण कसे क्षणात बदलते ते …
तर माझे ठरवलेच आता … सर्वांशीच गोड बोलायचे ..
मग .. पटला ना माझा संकल्प .. आणि तो मी कठोरपणे
अंमलात आणणार.. बरं का ..
तुम्ही लोकांनी काय काय संकल्प केलेत हे वाचण्याची
उत्सुकता आहेच मला .. हो .. कुणी शेखचिल्ली म्हणू द्यात
आपले ठरले .. संकल्प करायचा नि तो पाळायचा …
बरंय् मंडळी …

धन्यवाद …

साबळे सरांना जास्त , त्यांच्यामुळे माझी तर चंगळच
आहे.. नवनविन विषय मिळतात आणि प्रेशर (चांगल्या
अर्थाने) असल्यामुळे लिहून होतेच ..
मला आता वेळ मिळाल्याबरोबर तासाभरात मोबाईलवर
लगेच लिहून काढला …

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 4 =