You are currently viewing दीपक केसरकर व नितेश राणे सावंतवाडीत प्रचाराचा शुभारंभ करणार..

दीपक केसरकर व नितेश राणे सावंतवाडीत प्रचाराचा शुभारंभ करणार..

सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक..

 

सावंतवाडी :

 

आमदार नितेश राणे हे उद्या सावंतवाडी येथील तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुक प्रचारासाठी सावंतवाडीत येणार आहे. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक 12 नोव्हेंबरला होत असून 14 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी युतीच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. उद्या श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल ची अधिकृत घोषणा होणार असून राजवाडा पाटेकर मंदिरात श्रीफळ ठेवून 11.00 वाजता प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी भाजपकडून देण्यात आली.

यावेळी नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष राजन तेली, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, आणि उपस्थित राहणार आहे. तरी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक व पॅनल प्रमुख महेश सारंग, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × three =