सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १ नोव्हेंबरपासून व्याज दरामध्ये वाढ केली आहे. बँकेने एक वर्ष कालावधीसाठी ६.५० टक्के तर २ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीकरिता ७.०० टक्के असा व्याजदर ठेवला आहे. बँकेच्या सर्व ‘अ’ वर्ग भागधारक सभासद व ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर नियमित व्याजदरापेक्षा अर्धा टक्का ज्यादा व्याजदराची सवलत आहे. बँकेच्या सर्व ग्राहकांनी त्यांच्याकडील रक्कम गुंतवून वाढीव व्याजदरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.