You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालय, कै .हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्याल व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल प्रशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…..

अर्जुन रावराणे विद्यालय, कै .हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्याल व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल प्रशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…..

अर्जुन रावराणे विद्यालय,कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन 27 एप्रिल 2022 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध गुणदर्शन कार्यक्रम तसेच दहावी बारावी मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच गेल्या शैक्षणिक वर्षातील प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता, लेख, चित्रे, चारोळी व इतर साहित्य संकलित करून तयार केलेला *” स्पंदन“* या हस्तलिखिताचे वैभववाडी नगर पंचायत नगराध्यक्षा नेहा माईनकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी श्री मुकुंद शिनगारे वैभववाडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

वैभववाडी नगरपंचायत च्या सर्व नूतन नगरसेवकांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयेंद्र रावराणे होते. प्रमुख पाहुणे श्री. यशवंत रावराणे , बाजीराव रावराणे , विजय रावराणे, सत्यवान रावराणे , वाभवे – वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा श्रीम. नेहा माईंनकर, उपनगराध्यक्ष संजय गुरव ,सोनिया शिंदे , मुकुंद शिनगारे गटशिक्षणाधिकारी, रत्नाकर कदम, रोहन रावराणे , राजू पवार आणि सर्व नगरसेवक आणि नगरसेविका , मुख्याध्यापक श्री नादकर बी. एस. उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी श्री शिनगारे यांनी शाळेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले आणि कोविड काळातील शिक्षकांच्या योगदानाबद्दल कौतुक केले. अध्यक्ष श्री जयेंद्र रावराणे यांनी शाळा प्रगती विषयी व भविष्यातील शाळेच्या योजनांबद्दल माहिती दिली. वार्षिक स्नेहसंमेलनाने शैक्षणिक वर्षाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रभू, पाटील मॅडम, शिंदे मॅडम,भोसले मॅडम यांनी केले. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नादकर बी.एस. यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. सावंत पी. जे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा