You are currently viewing जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती कार्यक्रम अंमलबजावणी समिती अशासकीय सदस्य पदासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा -:सचिन साठे

जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती कार्यक्रम अंमलबजावणी समिती अशासकीय सदस्य पदासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा -:सचिन साठे

सिंधुदुर्गनगरी

जिल्हास्तरीय जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2013 मध्ये नरबळी आणि इतर अमानुष्य, अनिष्ट, अघोरी, अघारी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी कायदा केला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 7 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. समाजपयोगी, समाजसेवेची आवड व ईच्छा असणाऱ्या व्यक्तींनी दि. 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.

            समितीवर शासन निर्णयानुसार 7 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, यामध्ये 2 महिला सदस्य, 1 जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छूक व्यक्तींनी अर्ज हस्तलिखित वैयक्तिक तपशीलासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे सादर करावे. सदस्यांची अंतिम निवड पीआयएमसी अध्यक्ष व समाज कल्याण आयुक्त पुणे हे करणार आहेत. तरी इच्छुकांनी विहित कालावधीत अर्ज करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा