You are currently viewing कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजचे राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयीन स्पर्धेत यश

कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजचे राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयीन स्पर्धेत यश

कुडाळ :

 

कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजने के सी काॅलेज मुंबई आयोजीत राष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. २३ व २४ फेब्रुवारी रोजी के. सी. काॅलेज मुंबई येथे स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत, मूट कोर्ट, राष्ट्रीय मिडिएशन स्पर्धा, क्लायंट काऊन्सिलींग, लेटर टू चिफ जस्टीस ४ प्रकारात सहभाग नोंदवला. राष्ट्रीय मिडिएशन व लेटर टू चीफ जस्टीस या प्रकारांमध्ये अंतिम फेरीत मजल मारत व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजने उपविजेतेपद पटकावले.

केसी लाॅ काॅलेज मुंबई, यांच्या तर्फे प्रथमच राष्ट्रीय स्तरावर आयोजीत झालेल्या ‘मिडिएशन’ प्रकारात व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या सहिष्णू पंडित व एडवर्ड पिंटो, प्रतीक सावंत यांनी चमकदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावून दिले. या स्पर्धेतील सहिष्णू पंडित यांच्या कामगिरीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री. देशमुख व श्री. मर्णे यांनी राष्ट्रीय ‘मिडिएशन’ प्रकारात विशेष प्रशंसा केली.

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजने या स्पर्धेत, मूट कोर्ट, राष्ट्रीय मिडिएशन स्पर्धा, क्लायंट काऊन्सिलींग, लेटर टू चिफ जस्टीस या ४ प्रकारांत सहभाग नोंदवला. यापैकी राष्ट्रीय स्तरावरील मिडिएशन व लेटर टू चीफ जस्टीस या प्रकारांमध्ये अंतिम फेरीत मजल मारत व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजने उपविजेतेपद पटकावले. लेटर टू चीफ जस्टीस या प्रकारात यशोधन सावंत व संजय झांटये यांनी उपविजेतेपद पटकावले. सर्व यशस्वी उपविजेत्या स्पर्धकांना मुंबई उच्च न्यायालय न्यायाधीश यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजच्या सर्व सहभागी व यशस्वी स्पर्धकांचे व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजचे चेअरमन व्हिक्टर डांटस, प्राचार्या शिल्पा मर्गज, प्राध्यापक व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मूट कोर्ट प्रकारात महिमा माने, हिताक्षी तारी, संपदा परब तर क्लायंट काऊन्सिलींग प्रकारात यशोधन सावंत व संजय झांटये यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज तर्फे ॲड. प्रा. संग्राम गावडे सर्व सहभागी स्पर्धकांचे व्यवस्थापक होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × five =