You are currently viewing भेडशीतील नियोजित पूलाचे काम तसेच पर्यायी रस्ता तात्काळ पुर्ण करा

भेडशीतील नियोजित पूलाचे काम तसेच पर्यायी रस्ता तात्काळ पुर्ण करा

भाजपा ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिध्देश पांगम यांच्याकडून सा. बां. विभागाला निवेदन सादर

दोडामार्ग

भेडशीतील नियोजित पूलाचे काम तसेच पर्यायी रस्ता तात्काळ पुर्ण करावा यासाठी  सार्वजनीक बांधकाम उपविभाग अधिकारी यांची भेट घेत तसे लेखी निवेदन भाजपा ओबीसी सेल तालुका अध्यक्ष सिध्देश पांगम यांच्याकडून बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री घंटे यांना देण्यात आले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत विष्णू मुंज आबा जुवेकर ,तुळशीदास नाईक उपस्थीत होते.

यावेळी श्री.बडे व संबधित ठेकेदारांसोबत झालेल्या चर्चेत नोव्हेंबर अखेर पर्यायी रस्ता पुर्ण करून देऊ, तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून नियोजीत पुलाच्या कामाला सुरवात करून एप्रील अखेर काम पुर्ण करुन देण्याची ग्वाही दिली.तसेच क्रीडासंकुलाची कार्यारंभ आदेश मिळाला असुन भुमिपुजनाची वेळ ठरऊन लगेच त्याही कामाला सुरवात होईल असे श्री बडे यांनी सांगितले.सांगीतलेल्या शब्दाप्रमाणे कामाला सुरवात न झाल्यास आम्ही आक्रामक पवित्रा घेउ असेही सांगण्यात आले त्या बाबतचे तसे बांधकामचे श्री.घंटे याना निवेदन ही देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा