You are currently viewing नगर पंचायतच्या कामावर आपण समाधानी नाही – आ नितेश राणे

नगर पंचायतच्या कामावर आपण समाधानी नाही – आ नितेश राणे

मरगळ झटकून कामाला लागण्याचे केले आवाहन

वैभववाडी

वैभववाडी शहरवासीयांच्या गरजा पूर्ण करणे, शहराचा विकास करणे ही आपली जबाबदारी आहे. नगरपंचायतीवर पुन्हा सत्ता येऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. परंतु मी न. पं. च्या कामावर समाधानी नाही. पत्र व्यवहार करून थांबू नका. कामांचा पाठलाग करा, मरगळ झटकून कामाला लागा, अशा सक्त सूचना नगरसेवक व मुख्याधिकारी यांना आमदार नितेश राणे यांनी दिल्या.

आमदार नितेश राणे यांनी वाभवे- वैभववाडी नगरपंचायत कामाचा आढावा घेतला. राज्यात आता युतीची सत्ता आलेली आहे. स्थानिक आमदार सत्तेतील आहे. सत्तेचा फायदा येथील जनतेला झाला पाहिजे. शहराच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या. निधी कमी पडू देणार नाही. पुढील काळात नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी कामामध्ये सुधारणा करावी, यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. सांडपाण्याचा विषय, सुसज्ज गार्डन आदी कामे मार्गी लावणे ही आपली जबाबदारी आहे. विकासाला निधी आम्ही पडू देणार नाही. त्याचबरोबर कामचुकार अधिकारी व नगरसेवकांनाही सोडणार नाही असा सज्जड दम आमदार नितेश राणे यांना दिला. यावेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर, भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, प्राची तावडे, विवेक रावराणे, सुंदरी निकम, मुख्याधिकारी सुरज कांबळे, किशोर दळवी, प्रकाश पाटील, बंड्या मांजरेकर, प्रकाश सावंत, उदय पांचाळ व कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + four =