You are currently viewing देवगड-तोरसोळे येथील अनधिकृत खाणींच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

देवगड-तोरसोळे येथील अनधिकृत खाणींच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

सिंधुदुर्गनगरी

देवगड-तोरसोळे येथील अनधिकृत खाण व्यवसायामुळे बागायती, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत यांना धोका निर्माण झाला आहे .याबाबत तक्रार देउनही संबंधित तहसीलदार करवाई करत नसल्याने जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी व न्याय मिळावा यासाठी देवगड धोपटेवाडी येथील सीताराम जाधव व पूनम जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मुलाना घेऊन उपोषण सुरु केले आहे.
देवगड तालुक्यातील तोरसोळे येथिल अनधिकृत (खाण) उत्खननामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, तसेच फळ बगायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत तक्रार देऊन ही संबंधित अधिकारी करवाई करत नाहीत. एका ठिकाणी परवाना घेऊन अनेक ठिकाणी चीरे खाण व्यवसाय सुरु आहे. याची मोजमाप केले जात नाही. शासनाचा महसुल बुडविला जात आहे. तरी असे ख़ाण व्यवसायची सखोल चौकशी करून येथिल अनधिकृत उत्खनन तात्काळ बंद करावेत या मागणीसाठी देवगड धोपटेवाडी येथील सीताराम चंद्रकांत जाधव व पूनम सीताराम जाधव यांनी आपल्या चार मुलांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यामार्फत सुरु असलेल्या अनधिकृत खाण व्यवसायची चौकशी करावी व अनधिकृत खाण व्यवसाय बंद करावे अशी मागणी निवेदनद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =