You are currently viewing महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग चे १९ ऑक्टोबर २०२३ रोजी धरणे आंदोलन

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग चे १९ ऑक्टोबर २०२३ रोजी धरणे आंदोलन

*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग चे १९ ऑक्टोबर २०२३ रोजी धरणे आंदोलन*

सिंधुदुर्ग

आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विज्ञान विषय समूहातील पदोन्नत्या मागील काही वर्ष रखडलेल्या आहेत. विज्ञान विषय समूहातील शिक्षकांची कमतरता पाहता आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील कार्यरत प्राथमिक शिक्षकांमधील विज्ञान समूहातील पदवीधर शिक्षकांना पवित्र पोर्टल भरतीपूर्वी विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती देण्यात यावी या मागणी साठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग विज्ञान पदाविधाराकांसोबत १९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
इयत्ता ६ वी ते ८ वी वर्गांकरिता गणित व विज्ञान हे दोन कठीण समजले जाणारे विषय पदवीधर शिक्षकांनी शिकविणे अपेक्षित आहे. गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी पदवीधर शिक्षक उपलब्ध नसल्याने इतिहास, भूगोल किंवा मराठी इत्यादी विषय घेऊन पदवीधर झालेल्या शिक्षकांना सध्या गणित व विज्ञान हे विषय शिकवावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान या दोनही विषयांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत चालू असणाऱ्या ६ वी ते ८ वी वरिष्ठ प्राथमिक शाळेत गणित- विज्ञान विषय शिक्षकांच्या एकूण मंजूर ३०९ पदापैकी २२४ पदे अद्यापही रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून गणित – विज्ञान अध्यापनाच्या दर्जावर विपरीत परिणाम होत आहे.
शिक्षकांअभावी गुणवत्ता खालावत असून पटसंख्या ही धोक्यात येऊ लागली आहे. RTE Act 2009 नुसार प्रत्येक वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक विज्ञान विषय शिक्षक उपलब्ध असणे बंधनकारक आहे. शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन निर्णय १६ डिसेंबर २०१३ नुसार वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहिले पद हे गणित-विज्ञान शिक्षका करता अनिवार्य आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्राथमिक शिक्षकांसाठी V92 या अभ्यासक्रमांतर्गत विज्ञान पदवी धारण करण्याची संधी दिलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शिक्षकांनी यातून विज्ञान पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच काही शिक्षकांनी विज्ञान पदवीसाठी साठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ विज्ञान पदवीधारक शिक्षकांना २०२० साली पदोन्नती देण्यात आलेलेली आहे. त्याचप्रमाणे या शिक्षकांसाठी विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती कार्यक्रम आगामी शिक्षक भरतीपूर्वी त्वरित राबवावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गची आहे.
सदर धरणे आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज्ञान पदवीधारकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष गणेश भिकाजी नाईक यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा