You are currently viewing नाधवडे विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नाधवडे विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी :

 

वैभववाडी येथील नाधवडे विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी प्रमाणेच कार्तिकी एकादशीचा सोहळा रंगणार आहे. येथील मंदिरात यानिमित्ताने सात प्रहाराचा हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दि. ४ व ५ नोव्हेंबर ला हा कार्यक्रम होणार आहे. स्थानिक भजनी मंडळांची सुस्वर भजने होणार आहेत.

एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईच दर्शनही भाविकांना घेता येणार आहे. भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असं आवाहन नाधवडे आषाढी कार्तिकी एकादशी उत्सव समितीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा