You are currently viewing साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, नाशिकचे जागतिक साकव्य संमेलन थाटात संपन्न

साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, नाशिकचे जागतिक साकव्य संमेलन थाटात संपन्न

*साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, नाशिकचे जागतिक साकव्य संमेलन थाटात संपन्न*

*अभिनेते दीपक करंजीकर, अभिनेते डॉ.राजेश आहेर, अभिनेते सी.एल.कुलकर्णी, विश्वास बँक, विश्वास रेडिओचे विश्वास ठाकूर यांची विशेष उपस्थिती*

*देश विदेशातील सदस्यांची लक्षणीय उपस्थिती*

साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, नाशिकचे पहिले जागतिक साकव्य संमेलन नाशिक येथील भावबंधन मंगल कार्यालयात देश विदेशातील सदस्यांच्या उपस्थितीत थाटात पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साकव्यचे प्रमुख व्यावसायिक, कवी, लेखक पांडुरंगजी कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिग्गज चित्रपट अभिनेते दीपक करंजीकर, डॉ.राजेश आहेर व सी.एल.कुलकर्णी उपस्थित होते.
रविवारी सकाळी नाशिकच्या गुलाबी थंडीत हनुमान मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. साकव्य सदस्यांनी मोठ्या उत्साहात दिंडीत हरिनामाचा गजर करत सहभाग घेतला. साकव्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे असलेले अभिनेते सी.एल.कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संमेलनाची गुढी उभारली गेली. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष पांडुरंगजी कुलकर्णी, अभिनेते दीपक करंजीकर, सी.एल.कुलकर्णी, बाळासाहेब मगर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. अभिनेते दीपक करंजीकर यांनी संमेलनास शुभेच्छा देताना अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं. भावबंधन मंगल कार्यालयात संमेलन होत असल्याने बाळासाहेब मगर यांनी मंगल कार्यालयाला गडकरींच्या नाटकाचे नाव देऊन रसिक मनाची पोच पावती दिली असे सांगत बाळासाहेब मगर यांच्यातील साहित्यिकाला सर्वांसमोर आणले. चार चार फॅक्टरीचे चेअरमन असलेले आणि व्यवसायातून निवृत्त घेत साहित्याला वाहून घेतलेल्या पांडुरंगजी कुलकर्णी यांचे देखील तोंड भरून कौतुक केले. डॉ राजेश आहेर यांची काम करण्याची ऊर्जा उत्तम असल्याची सांगतानाच सी एल कुलकर्णी हे उत्तम चित्रकार, कवी, शिल्पकार, अभिनेते असून अजून पुढील ५० वर्षे त्यांना आयुष्य असून आणखी बरंच काही कौशल्य ते विकसित करतील अशी कोपरखळी मारली. भविष्यात ट्विटर, फेसबुकवर देखील संमेलने भरावा असा संदेश साकव्यला देत, जगातल्या संस्था कान गोष्टींनी पसरल्या, केवळ हेतू चांगला हवा असे सांगितले.
अभिनेते आणि पानिपत या चित्रपटात आघाडीची भूमिका केलेले डॉ.राजेश आहेर यांनी संमेलनाला शुभेच्छा देत नटसम्राट मधील बेलवलकर या व्यक्तिरेखेचा उत्तम अभिनय सादर केला. विविधांगी गुणांची खाण असलेले अभिनेते, कवी सी.एल.कुलकर्णी यांनी देखील मनोगत व्यक्त करताना साकव्य ने कला संस्कृतीची जोपासना ही छान कल्पना राबवली असून प्रत्येक माणसापर्यंत साकव्य पोचून कलासंस्कृती जोपासली पाहिजे अशी आशा व्यक्त केली. बाळासाहेब मगर यांनी देखील संमेलनाला शुभेच्छा देताना साकव्य उपक्रम नव्या पिढीला साहित्याची ओळख करून देणारे ठरतील, शहरात किती साहित्यिक आहेत, साहित्याचा किती जागर चालतो यावर शहराची ओळख असते असे सांगत विनोद आणि वक्तव्य हे दोन विषय साकव्य ने आपल्या कार्यक्रमात समाविष्ठ करण्याची सूचना केली. विश्वास रेडिओ व विश्वास बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर यांनी संमेलनाला शुभेच्छा देत, भविष्यातही अशा सांस्कृतिक कार्यक्रमास आपला सदैव मदतीचा हात असेल असे सांगितले. सर्व मान्यवरांचे साकव्य अध्यक्षांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
साकव्यच्या सुरुवातीपासून कार्यरत होत्या त्या साकव्यकन्या कै.डॉ.रसिका जाधव देशमुख कलादालनातील त्यांच्या चित्रांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कै.डॉ.रसिका जाधव देशमुख यांच्या परिवारास साकव्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन व वाटप करण्यात आले. इतर साकव्य सदस्या जयश्री कुलकर्णी व सुजाता पुरी यांच्याही काव्यसंग्रहांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सकाळच्या सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मेघना साने यांनी केले तर प्रास्ताविक साकव्य उपाध्यक्ष डॉ. चिदानंद फाळके यांनी केले. सर्वप्रथम साकव्य सचिव चंद्रशेखर शुक्ल, मंदार सांबारी आदींनी साकव्य गीत सादर करून वातावरण निर्मिती केली.
भोजन पूर्व गजल विविध कला व व्यक्तित्व विकास कार्यक्रम पार पडले यात गायत्री भट मुळे यांनी लावणी, जलातरंग वादन, रज्जाक शेख निफाड यांचे, क्लोरोनेट वदन, शैलजा देशमुख, तृप्ती देशमुख, प्रवीण व्यास, डॉ लक्ष्मीकांत भट, सुरेखा मैड, अर्चना पंडित यांचे गायन, परदेशातून खास संमेलनासाठी आलेल्या नलिनी खापरे यांच्या नाट्यछटा, चारुकेशी लवाटे यांचे नारदीय कीर्तन यांनी संमेलनात रंग भरले. गजल सादरीकरण कार्यक्रम गझलकार अभिजित काळे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे गझलकार संजय गोरडे, व गोरख पालवे यांच्या उपस्थितीत पार पडला. रामचंद्र कुलकर्णी, प्रदीप तळेकर, डॉ मृणाल कुलकर्णी, रवींद्र सोनावणे, हेमंत कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी आदी अनेक दिग्गज गझलकरांनी अजरामर केला. गझल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार राज शेळके यांनी केलं.
दुपार नंतरच्या सत्रात अनेक कवींच्या कवितांनी कार्यक्रमात रंगत आणली. खास यु के(लंडन) मधून आलेल्या कल्पना गवरे, बर्वे, विलास कुलकर्णी, स्वाती रत्नपारखी, संजय माकोणे, सिंधुदुर्गातून आलेले कवी दीपक पटेकर, मंदार सांबारी, आदिती मसुरकर, कलकत्त्यावरून आलेले अनिल देशपांडे, राखी जोशी, भारती देव, डॉ.चिदानंद फाळके, आदी अनेकांनी काव्यरचना सादर केल्या. काव्यसम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सौ.सुमती पवार होत्या तर प्रमुख पाहुणे इंदोरहून खास आलेले संजीव दिघे होते. प्रा.सुमती पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सहभागी कवींचे कौतुक केले आणि आपली एक अप्रतिम रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्री.पांडुरंगजी कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सहभागी सर्वांचे कौतुक केले आणि साकव्यची घोडदौड अशीच सुरू रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. काव्य मंचाचे सूत्रसंचालन राखी जोशी व भारती देव यांनी केलं.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्व साकव्य सदस्यांना प्रमाणपत्र व साकव्य सन्मानचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमात साकव्य सदस्य जे आज आपल्यात नाहीत ते डॉ.रसिका जाधव, निशिकांत देशपांडे, आणि साकव्य गीत लिहिणारे अरविंद ढवळीकर यांची आवर्जून आठवण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी साकव्य अध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर शुक्ल, हरिभाऊ कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ.चिदानंद फाळके, जनसंपर्क अधिकारी विलास कुलकर्णी, खजिनदार प्रियंका कुलकर्णी, आदी कार्यकारिणी सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली. भावबंधन कार्यालयाचे मालक बाळासाहेब मगर, विश्वास बँकेचे विश्वास ठाकूर आदींनीही मोलाचे सहकार्य केले.

Advt

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा