You are currently viewing ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले हे भाजपचे यश – भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले हे भाजपचे यश – भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे

*ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले हे भाजपचे यश – भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे*

-महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गमावलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण काल शिंदे-फडणवीसांच्या महायुती सरकारमुळेच पुन्हा मिळवून देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखविले आहे अशी प्रतिक्रिया भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी देत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टानं काल ओबीसी सहित निवडणुका त्वरीत घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. तेव्हा जिल्हयातील भटके विमुक्त आघाडी व ओबीसी सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सामान्य जनतेत जावून या निर्णयाची माहिती देवून जनजागृती करावी असे आवाहनही काळे यांनी केले आहे.

याशिवाय राज्यात रखडलेल्या निवडणुका तातडीनं घेण्यासंदर्भात पावलं उचलण्यास ही कोर्टानं सांगितलं आहे. कोर्टाच्या आदेशानुसार येत्या दोन आठवड्यात आरक्षण सह निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, त्या आधीच सर्वांनी प्रत्येक मतदार संघात कमळ फुलविण्यासाठी तयारीला लागा, अश्या सूचना काळे त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिले आहेत.सुप्रीम कोर्टासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री.काळे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा