“साद फाउंडेशन सिंधुदुर्ग” यांच्यावतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विजेते एल. एम. नाईक स्मृती प्रित्यर्थ कुडाळ नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त शिधा वाटप करण्यात आले. यावेळी कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी तथा साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली नाईक, खजिनदार गौरेश नाईक, लतिका नाईक आणि कुडाळ नगर कुडाळ नगरपंचायत करविभाग प्रमुख रचना कोरगावकर, स्वप्निल पाटील, संदीप कोरगावकर, विजय खरात आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सफाई कर्मचारी वर्ग हा कंत्राटी कामगार तुटपुंज्या पगारावर काम करत असतो. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा. यासाठी आपलं एक सामाजिक दायित्व असते. त्या अनुषंगाने वडिलांच्या स्मरणार्थ कुडाळ नगरपंचायतच्या जवळपास 40 सफाई कर्मचाऱ्यांना तांदूळ, डाळ, साबण, मिठाई वाटप नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित करण्यात आल्याची माहिती सादर फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली नाईक यांनी दिली.
कुडाळ नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांना साद फाउंडेशन यांच्यावतीने दिवाळी निमित्त शिधा वाटप
- Post published:ऑक्टोबर 29, 2022
- Post category:कुडाळ / बातम्या / विशेष / सामाजिक / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments
You Might Also Like
बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला
सावंतवाडी एसटी बस स्थानकाच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ” आरोग्य कृती समिती” ची स्थापन – एस.टी.सावंत, वरिष्ठ सल्लागार.
