You are currently viewing निगर्वी, सुस्वभावी लोकनेता..

निगर्वी, सुस्वभावी लोकनेता..

विशेष संपादकीय…

साधी राहणी उच्च विचारसरणी हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जुन्या जाणत्या नेत्यांची विचारसरणी घेऊन मुंबई येथून जिल्ह्यात येत दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवत राणेंसारख्या बलाढ्य उमेदवारास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने धोबीपछाड दिलेले विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांचा वाढदिवस. खासदार असूनही पाय जमिनीवर असलेले द्रष्टे नेतृत्व म्हणजे विनायक राऊत. आपल्या उत्कृष्ट भाषा शैलीने कोकणचे प्रश्न संसदेत प्राधान्याने मांडणारे विनायक राऊत आपल्या मतदारसंघातील सुधारणांसाठी प्रयत्नशील असतात. वेळोवेळी मतदारसंघाच्या हितासाठी त्वेषाने विचार मांडतात, त्यामुळे कोकणच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम दिल्ली दरबारी होत असते.

खासदार राऊत हे जनतेत वावरताना जनतेचेच होऊन जातात. कार्यकर्त्यांशी बोलताना तो लहान आहे की नेता आहे हे कधीच पाहत नाहीत. कार्यकर्त्यांच्या अडचणींमध्ये धावून जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते जनतेत लोकप्रिय झाले आहेत. पूर्वीच्या या राजापूर मतदारसंघाचे नेतृत्व बॅरिस्टर नाथ पै,  प्रा.मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्यासारख्या मातब्बरांनी केलं आहे. त्यामुळे विनायक राऊत खासदारकीला उभे राहिले तेव्हा लोकांच्या मनात अनेक शंका होत्या. परंतु आपली उच्च विचारसरणीच्या जोरावर खासदार राऊत हे मतदारसंघातील अत्यंत प्रभावी नेते म्हणून संसदेत पुढे आले. कोकणातील अनेक प्रश्न त्यांनी संसदेत लावून धरले त्यामुळे कोकणचे भाग्यविधाते म्हणून दिल्ली दरबारी त्यांची ओळख निर्माण झाली.

खासदार राऊत यांच्याकडे काम घेऊन गेलेला माणूस कधीच रिकामी हाताने परतत नाही. आपल्या हसतमुख शांत स्वभावामुळे त्यांनी जनमानसांत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये तर ते फेव्हरेट आहेतच परंतु जनसामान्य लोकांशी असलेल्या दांडग्या संपर्कामुळे ते जनतेमध्ये सुद्धा फेव्हरेट झाले आहेत. अशा या निर्गवी, सुस्वभावी लोकनेत्याचा आज वाढदिवस.

🌹💐🌹*संवाद मिडियाकडून* खासदार राऊत यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आणि भावी वाटचाली साठी सदिच्छा…🌹💐🌹

🏹🌹 *शिवसेना सचिव तथा रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹🌹💐

—————————————————

🌹 *शुभेच्छुक -* 🌹

संदेश पारकर,

युवा नेते, शिवसेना

🌹 *शुभेच्छुक -* 🌹

रूपेश राऊळ

सावंतवाडी तालुका प्रमुख, शिवसेना

🌹 *शुभेच्छुक -* 🌹

सागर नाणोस्कर

युवासेना उपजिल्हा प्रमुख

🌹 *शुभेच्छुक -* 🌹

खेमराज उर्फ बाबू कुरतडकर सावंतवाडी शहरप्रमुख, शिवसेना

🌹 *शुभेच्छुक -* 🌹

शब्बीर मणियार

माजी सावंतवाडी शहरप्रमुख, शिवसेना

🌹 *शुभेच्छुक -* 🌹

प्रेमानंद देसाई

अध्यक्ष, सरपंच संघटना सिंधुदुर्ग, शिवसेना

प्रतिक्रिया व्यक्त करा