You are currently viewing प्रख्यात फोटोग्राफर प्रदीप कालवणकर यांचे दुःखद निधन; वेर्ले गावावर शोककळा

प्रख्यात फोटोग्राफर प्रदीप कालवणकर यांचे दुःखद निधन; वेर्ले गावावर शोककळा

सावंतवाडी

तालुक्यातील धवडकी येथील साईकृपा फोटो स्टुडिओचे मालक, प्रसिद्ध फोटोग्राफर प्रदीप कालवणकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. हि घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांच्या निधनाची बातमी समजतात वेर्ले गावात शोककळा पसरली आहे.

फोटोग्राफर प्रदीप कालवणकर हे फोटोग्राफीच्या माध्यमातून तालुक्यातील धवडकी सह मागखोल, सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे आदी गावात सर्वांच्या परिचयाचे होते. तसेच ते शांत व मनमिळाऊ स्वभावाचे असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. परंतु ते गेल्या काही दिवसापासून हृदयविकाराने आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथे देखील उपचार करण्यात आले. मात्र त्यातून ते थोडेसे सावरले होते. पण आज अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =