You are currently viewing शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी घेतली भेट

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी घेतली भेट

सावंतवाडी :

 

महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेच्या माध्यमातून आज दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच बांधकाम कामगार यांचे प्रश्न शिष्यवृत्ती या विविध प्रश्नांविषयी वाचा फोडण्यासाठी सावंतवाडी येथे भेट घेतली. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अजूनही खात्यात जमा नाही.

शिष्यवृत्तीसाठी लावलेले विविध नियम तसेच कामगारांची नोंदणी करण्यासाठी होत असलेल्या अडचणी या विविध विषयी चर्चा करण्यात आली व तसे निवेदनही आमदार दीपक केसरकर यांना देण्यात आले. याविषयी लवकरच पालकमंत्री व कामगार मंत्री यांची भेट घेऊन आपण सिंधुदुर्ग मधील कामगारांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवतो असे दिपक केसरकर यांनी आज शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष तथा दोडामार्ग तालुका अध्यक्ष शशिकांत राऊळ, राज्य उपाध्यक्ष भारत पेंडूरकर, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, प्रभाग अध्यक्ष भूषण पाताडे, मालवण उपाध्यक्ष पंढरी पाताडे बांधकाम कामगार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + three =