You are currently viewing युवासेना माणगाव आणि श्री योगेश धुरी मित्रमंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेचा निकाल जाहीर..

युवासेना माणगाव आणि श्री योगेश धुरी मित्रमंडळ आयोजित नरकासुर स्पर्धेचा निकाल जाहीर..

 माणगाव कट्टवाडी-प्रथम क्रमांक

कुडाळ

दिपावलीच्या पूर्वसंध्येला युवासेना माणगाव आणि योगेश धुरी मित्रमंडळ आयोजित स्पर्धेचा निकाल जाहीर झाला .माणगाव कट्टावाडी चा प्रथम,द्वितीय क्रमांक हनुमान मित्रमंडळ, माणगांव बाजार,तृतीय क्रमांक ईसवटि मित्रमंडळ मळावाडी,उत्तेजनार्थ पारिजात नानेली,बाल संभाजी मित्रमंडळ बंदीचे माड यांनी पटकावला. यावेळी कुडाळ उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

यावेळी माजी जि.प.सदस्य राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, युवासेना कुडाळ शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, शहर समन्वयक अमित राणे,शिवसेना विभाग संघटक कौशल जोशी,बंड्या कुडतरकर, शिवसेना उपविभागप्रमुख बापू बागवे,माजी सरपंच बच्चू नाईक,युवासेना विभागप्रमुख रुपेश धारगळकर,श्री एकनाथ केसरकर सर,शैलेश विरनोडकर,बंटी भिसे,शंकर धुरी,किरण मुंज,नानेली ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश धुरी,पोलीस पाटिल नानेली संजय धुरी,परीक्षक म्हणून विनीत सातार्डेकर,वैभव कोंडसकर सर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा